जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

श्रेयवादाचा केविलवाणा प्रयत्न आता थांबवा-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेने सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करावीत अशी मागणी माजी आ.कोल्हे यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करणे हा फक्त आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रसिद्धीसाठी चाललेला केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

वर्षानुवर्षे नगरपरिषद पावसाळ्यापूर्वी नालेसफाई,शहर स्वच्छता आदी दैनंदिन कामे करतच असते. त्याला कोणाच्या आदेशाची गरज नसते.नगराध्यक्षपदी कुणीही असले तरी पालिकेचे प्रशासन,सर्व अधिकारी-कर्मचारी,आरोग्य विभाग शहर स्वच्छतेसाठी कार्यरत असतात.आताही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचे नियोजन सुरू असून नगरपरिषद प्रशासन सालाबादा प्रमाणेच कामकाज करीत आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संकटात कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत.-अध्यक्ष विजय वहाडणे

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,खरे तर वर्षानुवर्षे नगरपरिषद पावसाळ्यापूर्वी नालेसफाई,शहर स्वच्छता आदी दैनंदिन कामे करतच असते. त्याला कोणाच्या आदेशाची गरज नसते.नगराध्यक्षपदी कुणीही असले तरी पालिकेचे प्रशासन,सर्व अधिकारी-कर्मचारी,आरोग्य विभाग शहर स्वच्छतेसाठी कार्यरत असतात.आताही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचे नियोजन सुरू असून नगरपरिषद प्रशासन सालाबादा प्रमाणेच कामकाज करीत आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संकटात कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. कोपरगाव नगरपरिषद सातत्याने औषध फवारणी,धुर फवारणी करून शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे याच प्रयत्नात आहे.ते आमचे कर्तव्यच आहे.आम्ही जाहिरातबाजीत तुमच्याइतके तरबेज नाही.पण खोटे आरोप झाल्यानंतर नगरपरिषद काय करते हे आम्हाला नाईलाजाने जाहीरपणे सांगावेच लागते.पण केवळ प्रसिद्धी व फोटोसह बातम्यांची सवय लागल्यामुळे काहींना हाताशी धरून बातम्यांचा ओघ सुरू असतो. नगरपरिषदेत कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते असतांना त्यांना डावलून थेट मंत्र्यांपर्यंत निवेदन देऊन खरे तर त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांचा व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाचा अवमानच केलेला आहे.तसेच तीन दिवसांपूर्वी नगरपरिषद कार्यालयात येऊन “दुकाने सुरू करा” असा अनाठायी सल्ला अधिकाऱ्यांना द्यायचे काहीच कारण नव्हते. दुकाने,व्यवसाय सुरू झाले पाहिजेत अशी आपणही मागणी केलेली आहे.पण शासकिय आदेशाप्रमाणेच अधिकाऱ्यांना काम करावे लागते हे माहित नाही काय ? असा सवाल विचारून आमदार,नगराध्यक्ष कुणीही असले तरी मलाच फार कळवळा असल्याचा आव आणून दाखवणे वारंवार सुरू आहे.टाळेबंदीचे नियम डावलून,अधिकाऱ्यांसमोर गर्दि जमवून कोपरगाव शहराचे आरोग्य धोक्यात आणण्याचा उद्योग करून तुम्ही जनतेसमोर काय आदर्श ठेवणार आहात. आपल्या अनुपस्थितीत माजी आ. कोल्हे यांनी नगरपरिषदेत अधिकाऱ्यांसमोर बसून दबाव टाकणे कुठल्या नैतिकतेत बसते. सर्व प्रशासन कोरोनाच्या विरोधात लढत असतांना अशा प्रतिकूल स्थितीत नेत्यांनी प्रसिद्धीचे उद्योग करू नयेत.असा कडवट डोस द्यायला अध्यक्ष विजय वहाडणे हे शेवटी विसरले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close