जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आता कोपरगावतच कोरोना केअर सेंटर,सुरु होणार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव येथे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले असून यापुढे कोरोणाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना पुढील उपचार घेण्यासाठी अहमदनगर शासकीय रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात संभाव्य धोका टाळण्यासाठी बुधवार (दि.१३) पासून तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसुंदर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोरोना केअर सेंटरचे काम तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून यामध्ये ताप उपचार केंद्र, संशयित कक्ष व आयसोलेशन वार्ड यांचा समावेश असणार आहे.


कोपरगाव विधानसभा मतदार संघात जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असून आजमितीला एकही कोरोना बाधित अथवा संशयित रुग्ण नाही. तरीदेखील संभाव्य धोका टाळण्यासाठी बुधवार (दि.१३) पासून तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसुंदर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोरोना केअर सेंटरचे काम तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून यामध्ये ताप उपचार केंद्र, संशयित कक्ष व आयसोलेशन वार्ड यांचा समावेश असणार आहे. ताप उपचार केंद्रामध्ये कोपरगाव तालुक्यातील सर्दी,ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. सारी किंवा कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांना संशियत कक्षात दाखल करण्यात येणार आहे. या संशयीत कक्षामध्ये रुग्णांच्या घशातील स्त्राव घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून रुग्णांचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविला जाणार आहे.
ज्या रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह येतील अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या घरीच विलागिकरण करण्यात येणार आहे. यदाकदाचित एखाद्या रुग्णांचा तपासणी अहवाल सकारात्मक आला व त्या रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास अशा रुग्णांवर कोपरगाव येथेच उपचार केले जाणार असून रुग्णाला पुढील उपचारासाठी कुठेही पाठविण्याची गरज भासणार नाही. मात्र ज्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे असतील अशाच रुग्णांना पुढील उपचारासाठी अहमदनगरला शासकीय रुग्णालयात पाठवले जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना बऱ्याच दिवसापासून सर्दी,ताप,खोकला ताप येत असेल अशा रुग्णांनी काळजी घ्यावी.जास्त त्रास होत असेल तर तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये येवून आपली तपासणी करून आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close