कोपरगाव तालुका
पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात !
May 13, 2020
550 Less than a minute
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून मुक्त करू शकणाऱ्या ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्तरावरील खोदकाम समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सहकार्याने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी नुकतीच केली आहे.
कोपरगाव नागरपरिषदेस पाणी पुरविण्यात अहंम भूमिका निभावण्यात सक्षम ठरणाऱ्या जवळपास २२ एकराच्या या तळ्याचे १७ एकराचे खोदकाम करण्यात आले असून जमिनीच्या वरील ३ मीटर मातीचे उत्खनण करून त्याखाली अंदाजे ३ मीटर पर्यंत खोदाई करण्यात आली आहे.यापुढे कठीण दगडाची खोदाई करावी लागणार आहे त्याबाबत गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला खोदाई काम करण्यात येत असलेल्या अडचणी आ. आशुतोष काळे यांनी जाणून घेतल्या.
या पाहणी प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक वीरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,हिरामण गंगूले,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,माजी नगरसेवक दिनार कुदळे,कोपरगाव नगर परिषदेचे अभियंता दिगंबर वाघ,समृद्धी कन्स्ट्रक्शनचे प्रसाद सर,इंजिनिअर वैद्य आदी सुरक्षित अंतर पाळून उपस्थित होते.