जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यार्थ्याची परदेशी विद्यापीठात निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 
.
  कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी यश संजय नन्नावरे याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली असुन तो रवानाही झाला आहे.या कालावधीत तो डॉ.सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॉर मेडिकल डिव्हाईस’ या विषयावर संशोधन कार्य करणार आहे.ही इंटर्नशिप पूर्णतः प्रायोजित असून,यशच्या प्रवास,निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च दायेह विद्यापीठच करणार आहे.तैवानला इंटर्नशिपला जाणारा यश  हा ७६ वा विद्यार्थी ठरला असल्याचे मानले जात आहे.

संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे यांनी यश नन्नावरे याची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाल्याबध्दल त्यांच्या पालकांसह सत्कार केला.यावेळी डाॅ.कापगते,डाॅ.जावळे व डाॅ. गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. 

“संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परदेशातील इंटर्नशिपमुळे जागतिक स्तरावरील संशोधन,आधुनिक तंत्रज्ञान,प्रगत कार्यपद्धती आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत काम केल्याने त्यांचा आत्मविश्वास,संवादकौशल्य आणि जागतिक दृष्टिकोन अधिक व्यापक होतो.संजीवनीमध्ये विध्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून,भविष्यातही जगातील नामांकित विद्यापीठांशी सहकार्य वाढवून अधिकाधिक विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध प्रयत्नशील आहे”-अमित कोल्हे,अध्यक्ष,संजीवनी विद्यापीठ,कोपरगाव.

    यशला मिळालेल्या संधीबध्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे,संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  व्यवस्थापकीय संचालक मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे आदींनी त्याचे अभिनंदन करून त्याचा व त्याचे  वडील संजय नन्नावरे,आई उज्वला नन्नावरे यांचा सत्कार केला आहे.सदर प्रसंगी संस्थेचे संचालक डॉ.आर.ए.कापगते,डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ.महेंद्र गवळी,विभागप्रमुख डॉ.माधुरी जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संजीवनी विद्यापीठ,कोपरगाव.

“माझ्या या यशात आई-वडिलांचे कष्ट आणि संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.या संधीचा पुरेपूर उपयोग करून मिळालेला अनुभव पुढील शिक्षणात आणि करिअरमध्ये उपयोगात आणण्याचा माझा प्रयत्न राहील”- यश नन्नवरे,संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी.

   संजीवनीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागामार्फत विध्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप आणि संशोधनाच्या संधी मिळाव्यात,यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.यापूर्वीही विध्यार्थ्यांना रशिया,तैवान,कॅनडा,फिलिपाइन्स,ट्युनिशिया, युनायटेड किंगडम इत्यादी ठिकाणच्या नामांकित विद्यापीठांमध्ये दोन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळाली आहे.संस्थेच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
  
   यावेळी यशने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या असून तो म्हणाला की,”माझ्या या यशात आई-वडिलांचे कष्ट आणि संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.या संधीचा पुरेपूर उपयोग करून मिळालेला अनुभव पुढील शिक्षणात आणि करिअरमध्ये उपयोगात आणण्याचा माझा प्रयत्न राहील”

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close