अपघात
कोपरगाव नजीक अपघात, रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कमी होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाही परिणामी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आज पुणतांबा फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे उसाने भरलेली ट्रॅक्टरचा ट्रेलर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र,या घटनेमुळे रस्त्याच्या दुरवस्थेसह ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान या घटनेच्या निमित्ताने ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरून वाहतूक केली जात असताना,ती कायदेशीर आहे का? नसेल तर ती कोणाच्या परवानगीने होत आहे? निर्धारित क्षमतेनुसार वाहतूक केली जाते का ? क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जातो का ? याची संबंधित वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नगर-मनमाड महामार्गाची (क्रं.-61) दुरावस्था खरोखरच अत्यंत गंभीर बनली असून नागरिक,प्रवासी आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला हा प्रश्न संपण्याचे नाव घेत नसून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.विळद ते सावळीविहीर दरम्यानच्या ७५ किलोमीटरच्या काँक्रीटीकरण व रुंदीकरणाच्या कामाला प्रचंड उशीर होत आहे.राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान ठेकेदाराने एकाच वेळी दोन ठिकाणी कामे सुरू केल्यामुळे परिस्थिती अधिकच जटील बनली आहे.मुख्य रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी अवजड व इतर वाहतूक कधी सावळीविहीर-वांबोरी मार्गे वळवण्यात येते तर कधी ती शिर्डीला वळसा घालून तळेगाव दिघे मार्गे वळवण्यात येऊन त्या रस्त्याची वाट लावली जाते.मात्र त्यासाठी सिंहस्थ पर्वणीत एक फुकट्याकवडीची व्यवस्था संबंधित यंत्रणेने केलेली नाही.त्याबाबत कोणालाही जाब विचारावा वाटत नाही.यामुळे प्रवाशांना सुमारे ११ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा मारावा लागत असून इंधन आणि वेळेचा मोठा अपव्यय होत आहे.या अतिरिक्त भारामुळे अंतर्गत ग्रामीण रस्तेही खराब होत आहेत.महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आणि वाहतूक वळवल्यामुळे रस्त्यालगतचे ढाबे,हॉटेल्स,गॅरेज आणि फळ-भाजीपाला विक्रेते यांच्या व्यवसायात ३० ते ४० टक्क्यांची घट झाली असल्याचं मानले जात आहे.यात बळी जाणाऱ्यांचा संताप सगळ्यांना परिचित झाला आहे.या शिवाय वाहनांची वित्तीय हानीची मोजदाद नाही.त्यामुळे अपघात आता नागरिकांच्या आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय व्यवस्थेच्या अंगवळणी पडले असे म्हटले तर वावगे ठरू नये.असाच एक अपघात आज झाला असून यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथून ऊस भरून ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 इ.ए.0825) दोन ट्रेलरसह संजीवनी साखर कारखान्याकडे जात होता.ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेल्या दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरलेला होता.पुणतांबा फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने मागील टारली (क्रमांक एम.एच.16 एम.1446) पलटी झाल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती आहे.आजच्या अपघाताने रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

मुख्य रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी अवजड व इतर वाहतूक कधी सावळीविहीर-वांबोरी मार्गे वळवण्यात येते तर कधी ती शिर्डीला वळसा घालून तळेगाव दिघे मार्गे वळवण्यात येऊन त्या रस्त्याची वाट लावली जाते.मात्र त्यासाठी सिंहस्थ पर्वणीत एक फुकट्याकवडीची व्यवस्था संबंधित यंत्रणेने केलेली नाही.त्याबाबत कोणालाही जाब विचारावा वाटत नाही.यामुळे प्रवाशांना सुमारे ११ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा मारावा लागत असून इंधन आणि वेळेचा मोठा अपव्यय होत आहे.रस्त्यात नागरिकांचे बळी जात असताना राजकीय नेते मात्र अपघात झालं की फोटोशेषन करून आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेताना दिसून येत असून सदर रस्त्याचे काम चार दिवस चालू आणि चार महिने बंद असते याबाबत कोणीही संबंधित ठेकेदाराला जाबसाल करताना दिसून येत नाही.त्यामुळे नागरिकांचे बळी किडा मुंग्यासारखे जात आहेत.
या घटनेच्या निमित्ताने ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरून वाहतूक केली जात असताना,ती कायदेशीर आहे का? निर्धारित क्षमतेनुसार वाहतूक केली जाते का ? क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरला जातो का ? याची संबंधित यंत्रणांनी तपासणी करण्याची गरज आहे.या घटनेत अतिरिक्त भार वाहन (ओव्हरलोडिंग) झाले होते की नाही,याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान याबाबत नागरिकांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत,तसेच ऊस वाहतुकीच्या नियमांची तपासणी करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सुदैवाने आज जीवितहानी टळली असली,तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित ठेकेदार,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.



