जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

…केवळ निमंत्रीतवर बोळवण,नेत्याची नाराजी भोवली ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांची मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली असली तरी ती निमंत्रित असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.यात खा.शरद पवार यांची काळे यांच्या मागील कार्यकाळावर मोठी नाराजी असल्याने व माजी मंत्री दिलीप वळसे यांनी काहीअंशी मध्यस्ती केल्याने आगामी काळासाठी हे पद दिले असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.

रयत शिक्षण संस्था सातारा.

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत कधी काळी माजी खा.स्व.शंकरराव काळे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी एक छत्री अंमल केला असून काळे यांना कोल्हे यांनी राजकारण विरहित मदत केली असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे त्यांना जवळपास पंधरा वर्षे या संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.एवढेच नाही तर माजी खा.स्व.काळे यांनीही रयत शिक्षण संस्थेचा सांभाळ आपल्या मुलाप्रमाणे केला होता हे कोणालाही नाकारता येणार नाही.त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या हयातीत स्वतःची पर्यायी कोणतीही शिक्षण संस्था काढली नाही हे विशेष ! त्यांचे ऋण धरून आजही स्व.खा.काळे यांचे नाव आजही आदराने घेतले जात आहे.मात्र त्यांच्या निधनानंतर मात्र पुढील पिढ्यांत विशेषतः आ.आशुतोष काळे यांच्या कार्यकाळात जमीन आणि आकाशाचे अंतर पडले असल्याचे मानले जात आहे.त्यांतून ही नामुष्की ओढवली असल्याचे समजत आहे.

    रयत शिक्षण संस्था ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे,तर आशिया खंडातील एक अग्रगण्य आणि सर्वात मोठी ग्रामीण शिक्षण संस्था आहे.पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचा वटवृक्ष आज १६ जिल्ह्यांमध्ये (महाराष्ट्र आणि कर्नाटकसह) पसरला असून ७४० हून अधिक शाखांच्या माध्यमातून ४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देत आहे.कर्मवीरांनी सुरू केलेले “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे सूत्र आजच्या काळातही अत्यंत प्रभावी ठरत आहे.संस्थेने स्वायत्ततेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले असून, ‘कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ’ स्थापन करून उच्च शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.या संस्थेत कधी काळी माजी खा.स्व.शंकरराव काळे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी एक छत्री अंमल केला असून काळे यांना कोल्हे यांनी राजकारण विरहित मदत केली असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे त्यांना जवळपास पंधरा वर्षे या संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.एवढेच नाही तर माजी खा.स्व.काळे यांनीही रयत शिक्षण संस्थेचा सांभाळ आपल्या मुलाप्रमाणे केला होता हे कोणालाही नाकारता येणार नाही.त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या हयातीत स्वतःची पर्यायी कोणतीही शिक्षण संस्था काढली नाही हे विशेष ! त्यांचे ऋण धरून आजही स्व.खा.काळे यांचे नाव आजही आदराने घेतले जात आहे.मात्र त्यांच्या निधनानंतर मात्र पुढील पिढ्यांत जमीन आणि आकाशाचे अंतर पडले असल्याचे मानले जात आहे.विशेषतः आ.आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून सहा वर्षात हा फरक पडला असल्याचे मानले जात आहे.त्यात त्यांनी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक (के.बी.पी.)शाळेत असलेले जागा सरकारचे (जिल्हाधिकारी) नावांवर झाली असून या प्रकरणी तत्कालीन उत्तर विभागाच्या अध्यक्षांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे मानले जात आहे.त्यानंतर देर्डे-चांदवड येथील सुरू केलेले आय.टी.आय.हे व माध्यमिक शाळा ही यशस्वीपणे चालवणे गरजेचे असताना ती बंद पडली आहे.व त्या जागी त्यांच्या गौतमच्या शाळेची सुरवात करणे ही बाब नडली असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय भोजडे येथील शाळेची इमारत वगळता अन्य जागा ही रयत शिक्षण संस्थेने चमत्कारिकपणे गमावली असल्याचे मानले जात आहे.

 

   दरम्यान आ.आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून सहा वर्षात नेतृत्वात मोठा फरक पडला असल्याचे मानले जात आहे.त्यात त्यांनी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक (के.बी.पी.)शाळेत असलेले जागा सरकारचे (जिल्हाधिकारी) नावांवर झाली असून या प्रकरणी तत्कालीन उत्तर विभागाच्या अध्यक्षांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे मानले जात आहे.त्यानंतर देर्डे-चांदवड येथील सुरू केलेले आय.टी.आय.हे व माध्यमिक शाळा ही यशस्वीपणे चालवणे गरजेचे असताना ती बंद पडली आहे.व त्या जागी त्यांच्या गौतमच्या शाळेची सुरवात करणे ही बाब नडली असल्याचे बोलले जात आहे.याशिवाय भोजडे येथील शाळेची इमारत वगळता अन्य जागा ही रयत शिक्षण संस्थेने चमत्कारिकपणे गमावली असल्याचे मानले जात आहे.याची इत्यंभूत माहिती मोठ्या पवारांना असून परिणाम आता समोर आला आहे.

   दरम्यान या शिवाय वारी,गोधेगाव,कुंभारी,करंजी,धामोरी,रवंदे,आदी ठिकाणी रयतला आपल्या जागा (जमिनी) गमवाव्या लागल्या असल्याचे मानले जात आहे.या सर्व जागा एका जिल्हास्तरीय आपल्या हितेशी सचिवाला हाताशी धरून केल्या गेल्या असल्याचे मानले जात आहे.तर वारी,गोधेगाव येथील शाखा ०१ हजार १०० विद्यार्थी असताना (आज केवळ दोन अडीचशे विद्यार्थी शिल्लक आहे) या शेवटच्या घटका मोजत असून त्याला कारण माजी अध्यक्षांचा कारभार कारणीभूत मानला जात आहे.बरेच विद्यार्थी सोमय्या विद्यालयात आणि कनिष्ठ महाविद्यालयात जात आहे.शिवाय स्थानिक स्कूल या पूर्वी सर्वसमावेशक सर्व गटांतील लोक असत मात्र काळे अध्यक्ष झाल्यानंतर यात एकतर्फी मोठा बदल झाला असल्याचे मानले जात आहे.आणि या स्थानिक शाळा समितीत राजकारण घुसले असून सर्वसमावेशक धोरणाला मूठमाती दिली असल्याचे मानले जात आहे.त्यात केवळ एकच पक्षाचे म्हणजेच स्वतःचे लोक घुसडवले असल्याचे मानले जात आहे.परिणामी नाराज गटाने आपले विद्यार्थी काढून अन्यत्र घातले असल्याचे मानले जात आहे.परिणामी रयतच्या शाळेतील विद्यार्थी घटले असल्याचे दिसून येत आहे.शिवाय अनेक ठिकाण याची नगर जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली असल्याचे मानले जात आहे.

  

   दरम्यान या सर्व बाबींचे अहवाल माजी कृषी मंत्री आणि रयतच्या अध्यक्ष खा.शरद पवार यांचेकडे गेले असल्याचे विश्वसनीय मानले जात आहे.त्यामुळे जनरल बॉडीची निवडणूक ही ०९ मे २०२६ रोजी संपन्न झाली असताना पश्चिम गटाच्या नेत्याला मात्र यात सोयिस्कररित्या डावलले असल्याचे मानले जात आहे.त्यानंतर अनेक शिष्टमंडळ जाऊन आली मात्र तरीही खा.पवार यांचा राग मावळला असल्याचे दिसले नाही हे विशेष ! त्यासाठी एक नव्वदच्या दशकातील माजी नगराध्यक्ष,पश्चिम गडाचे तथा सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष,एक स्वीकृत संचालक आदींनी जीवाचे रान करूनही शरद पवार बधले नाही हे विशेष ! त्यानंतर माजी मंत्री आणि खा.पवार यांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे यांचे वळचणीला जाऊन पुणे येथील बैठकीत हे पद पदरात पाडून घ्यावे लागले असल्याचे मानले जात आहे.त्यांची विनंती आधी फेटाळली होती.मात्र आगामी काळात भाजपने गटांगळ्या झाल्या तर (पक्षांतर होऊन विधानसभेची एक जागा वाढेल या आशेपोटी) उपयोगी येईल म्हणून दिनांक १५ सप्तंबर २०२६ रोजी हे पद मोठ्या नाराजीने दिले असल्याचे मानले जात आहे.यात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत काम करणे ही बाबही आ.काळे यांना भोवली असल्याचे मानले जात आहे.याबाबत काळे समर्थकांनी दुजोरा दिला आहे.त्या बाबत रयत शिक्षण संस्थेच्या वर्तुळात आणि नगर जिल्ह्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.त्यातही त्यांचे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत  शुभेच्छा द्याव्या याला काय म्हणावे,” गिरे तो भी टांग उपर” दुसरे काय ?

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close