नदी प्रदूषण
दूषित पाण्यामुळे गाय मृत,चौकशीची मागणी!

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नाटेगाव,बदापूर,नांदेसरसह सहा गावातील भूजल प्रदूषित करणाऱ्या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीचा प्रश्न शेतकरी संघटनेने ऐरणीवर आणल्यानंतर नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून दूषित पाण्यामुळे एक गाय मृत झाली असल्याच्या बातम्या परिसरात पसरल्या आहेत.त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत प्रदूषण महामंडळ आणि पशुसंवर्धन विभागाने सदर गायीचे शव विच्छेदन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान एका शेतकऱ्यांची गाय ओढ्याचे पाणी पिऊन मृत झाली असल्याची माहिती या परिसरात झपाट्याने पसरली आहे.त्यामुळे नाटेगाव,बदापूर,खिर्डी गणेश, येसगाव,नांदेसर,पिंपळगाव जलाल आदी शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत प्रदूषण मंडळ आणि पशुसंवर्धन विभाग काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नाटेगाव,बदापूर,नांदेसरसह सहा गावातील भूजल प्रदूषित करून कृषीक्षेत्र उध्वस्त करणाऱ्या एका कंपनीच्या शेती क्षेत्रात सोडण्यात येणाऱ्या सांड पाण्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले होते.सदरचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित असल्याचे उघड झाल्याने या गावातील शेतकरी संघटनेने सदर कंपनी बंद करावी अशी मागणी केली होती.त्या मागणीला यश आले असून नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन उपक्रम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले होते.जल अधिनियम १९७४ आणि हवा अधिनियम १९८१ च्या तरतुदींनुसार तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मंडळाकडे कोणताही पर्याय राहणार नाही” अशी सक्त ताकीद प्रदूषण महामंडळाचे नाशिक येथील अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली होती.त्यानंतर सदर कंपनीने दूषित पाणी शुद्ध करण्याचा इ.टी.पी. प्रकल्प सुरू केल्याची माहिती हाती आली असली तरी ते अर्धसत्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून सदर ठिकाणी चार बॉयलर असताना केवळ एक दाखवला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.त्यानंतर कंपनीने महावितरण कंपनीकडून वीज जोडणी करून मोठी दिवाळी साजरी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते.त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करून शेतकऱ्यांच्या असंतोषात आणखी तेल ओतले होते.त्यामुळे या कंपनीविरुद्ध मोठा असंतोष व्यक्त होत आहे.त्यानंतर सदर कंपनी संचालकाने येवला,कोपरगाव शहर आणि राष्ट्रीय महामार्गावर चार कोटी खर्च करून मोठमोठे बॅनर लावून आपला वाढदिवस साजरा करून शेतकऱ्यांना आपले नाक खाजवून एक प्रकारे डिवचले होते.

दरम्यान एका शेतकऱ्यांची गाय ओढ्याचे पाणी पिऊन मृत झाली असल्याची माहिती या परिसरात झपाट्याने पसरली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत प्रदूषण मंडळ आणि पशुसंवर्धन विभाग काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

त्यामुळे वास्तवदर्शी माहिती समोर आणण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर आली असल्याचे मानले जात आहे.दरम्यान नुकतीच एक माहिती हाती आली असून त्यात एका शेतकऱ्यांची गाय दूषित पाणी पिल्याने मृत झाली असल्याची माहिती नाटेगाव आणि परिसरात पसरली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत प्रदूषण महामंडळ आणि पशुसंवर्धन विभागाने त्याबाबत चौकशी करून कारवाई करणे गरजेचे बनले असल्याचे मानले जात आहे.



