दुष्काळ
उद्या पालकमंत्री…या तालुक्यात येणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात चर्चा आणि आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे उद्या शनिवार दि.3 ऑक्टोंबर 2026 रोजी दुपारी 2.30 वा. कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगांव येथे येणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

“अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका दुष्काळाबाबत अपवाद नाही.त्यामुळे या तालुक्याचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उद्या दुपारी 2.30 वाजता कोपरगाव येथे कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगांव येथे येणार आहे.त्यामुळे आपल्या भागातील अडचणी आणि पाण्याची समस्या माणसांसाठी कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघ.
महाराष्ट्रात यंदा मान्सूनमधील पावसाची प्रचंड तूट (सुमारे १८% ते १९%) आणि ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्य सरकारने राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ (ट्रिगर-1) जाहीर केला आहे.याचा अर्थ राज्याचा जवळपास ७४% ते ७५% भाग सध्या दुष्काळाच्या तीव्र छायेत आहे.
मराठवाडा (३८% पावसाची तूट) आणि विदर्भ (२७% पावसाची तूट) या भागांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.जून ते सप्टेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये २५ ते ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे करपली आहेत.कापूस,सोयाबीन,मका,तूर आणि बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यवतमाळ (१६ तालुके),जळगाव (१५ तालुके), तसेच अहिल्यानगर (अहमदनगर),नागपूर,अमरावती आणि नांदेड (प्रत्येकी १४ तालुके) या जिल्ह्यांमध्ये स्थिती सर्वाधिक गंभीर आहे.या जिल्ह्यात पाऊस नसल्याने धरणांमधील पाणीसाठा खालावला असून,ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ‘ऑक्टोबर हीट’ आणि पाण्याच्या टंचाईची मोठी चिंता निर्माण झाली आहे.पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे.त्यामुळे कृषिक्षेत्राचे पाणी कमी होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होत आहे.त्यामुळे तिच्याकडे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका दुष्काळाबाबत अपवाद नाही.त्यामुळे या तालुक्याचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उद्या दुपारी 2.30 वाजता कोपरगाव येथे कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगांव येथे येणार आहे.त्यामुळे आपल्या भागातील अडचणी आणि पाण्याची समस्या माणसांसाठी कार्यकर्ते शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोदावरी- नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शेवटी केलं आहे.



