कामगार जगत
…या ठिकाणी “आनंद नोकरी मिळाव्याचे आयोजन!

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आगामी 9 ऑक्टोबर 2026 रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक संकुल येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आनंद नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.यात सुमारे 5 हजार युवकांना आपल्या पात्रतेप्रमाणे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून जागेवर ऑफर लेटर मिळणार असल्याची माहिती खा.वाकचौरे यांनी नुकतीच जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

“या मेळाव्यात पाचवी पास ते उच्च पदवीधरांपर्यंत प्रत्येक युवक यात सहभागी होऊ शकतो.या नोकरी मेळाव्यात अनुभवी उमेदवारांसाठी त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार विविध नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहेत.विशेष म्हणजे नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ देण्यात येणार आहे.हे जॉब कार्ड सहा महिन्यांसाठी वैध राहणार असून या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या योग्य नोकरीच्या संधींसाठी उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना कंपन्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे”- कमलाकर कोते,जिल्हाध्यक्ष,शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
वर्तमानात नोकऱ्यांची बेरोजगारी खरोखरच अत्यंत चिंताजनक आहे.आजचा तरुण उच्च शिक्षण घेऊनही रोजगारासाठी वणवण भटकत आहे.ही समस्या केवळ आर्थिक नसून सामाजिक आणि मानसिक दृष्ट्याही घातक ठरत आहे.आजच्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर जास्त भर आहे.मात्र,उद्योगांना ज्या आधुनिक कौशल्यांची गरज आहे,ती तरुणांकडे नसतात.नवीन कारखाने आणि उद्योग धंदे अपेक्षित प्रमाणात सुरू न झाल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत नाहीत.ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पारंपरिक स्वरूपाच्या अनेक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.सरकारी क्षेत्रातील भरती प्रक्रिया रखडल्यामुळे किंवा जागा मर्यादित असल्यामुळे लाखो तरुण वर्षांनुवर्षे स्पर्धा परीक्षांच्या चक्रात अडकून पडले आहेत.ही स्थिती ओळखून शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या मतदार संघात या आनंद नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.पुणे येथील युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मदत घेऊन जवळजवळ 78 पेक्षा जास्त उच्च दर्जाच्या कंपनी आपल्या एच.आर.टिमसह श्री साईंच्या शिर्डीत येऊन सहभागी होत आहे.अहिल्यानगर,पुणे,छत्रपती संभाजीनगर,नाशिक यां जिल्ह्याच्या मधोमध असलेल्या शिर्डी लोकसभा क्षेत्रात परिसरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित कंपन्या या नोकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

दरम्यान यावेळी महिलांसाठी गृहउद्योग प्रशिक्षण म्हणजे ज्या महिलांना स्वतःचा गृहउद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे,अशा महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे.नोंदणी केलेल्या महिलांसाठी गृहउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून,महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे”- दिपक पवार,युवा हबचे संचालक.
दरम्यान या भव्य नोकरी मेळाव्यामध्ये ऑटोमोबाईल्स,आय.टी.बँकिंग,फायनान्स,फार्मा,मॅन्युफॅक्चरिंग,इंजिनिअरिंग,लॉजिस्टिक्स,रिटेल,सेल्स-मार्केटिंग,बी.पी.ओ./आय. टी.ज.,हेल्थकेअर,हॉस्पिटॅलिटी आणि इतर विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यामध्ये टाटा मोटर्स,महिंद्रा अँड महिंद्रा, टी.सी.एस.आय.सी.आय.सी.आय.बँक,ॲक्सिस बँक,एच.डी.एफ.सी.बँक,बजाज ऑटो, टी.व्ही.एस.मोटर्स सन फॉर्मॉसिटिकल इंडस्ट्रीज,इन्फोसिस,लार्सन अँड टुर्बो,मारुती सुझुकी,यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या क्षेत्रांशी संबंधित रोजगाराच्या संधींचा समावेश असणार आहे.तसेच स्थानिक व प्रादेशिक पातळीवरील विविध एम.एस.एम.इ.,मॅन्युफॅक्चरिंग,ऑटोमोबाईल अन्सिलरी,सर्व्हिस सेक्टर आणि इतर कंपन्यांचाही सहभाग राहणार आहे.पाचवी पास ते उच्च पदवीधरांपर्यंत प्रत्येक युवक यात सहभागी होऊ शकतो.या नोकरी मेळाव्यात अनुभवी उमेदवारांसाठी त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार विविध नोकरीच्या संधी उपलब्ध असणार आहेत.विशेष म्हणजे नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ देण्यात येणार आहे.हे जॉब कार्ड सहा महिन्यांसाठी वैध राहणार असून या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या योग्य नोकरीच्या संधींसाठी उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना कंपन्यांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.महिलांसाठी गृहउद्योग प्रशिक्षण म्हणजे ज्या महिलांना स्वतःचा गृहउद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे,अशा महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे.नोंदणी केलेल्या महिलांसाठी गृहउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून,महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती युवा हबचे संचालक दिपक पवार तसेच किरण रहाणे यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे समवेत पत्रकार परिषदेत दिली आहे.युवकांनी नुकतेच लॉन्च केलेल्या क्यू.आर.कोडवर नोकरी मिळण्यासाठी अधिकृत नोंदणी करण्याचे आवाहन मुकुंद सिनगर यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,शिवसेना नेते राजेंद्र झावरे,युवानेते मुकुंद शिनगर,संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश कपिले यांच्यासह सचिन मलिक,रिंकेश जाधव,ओंकार गोंदकर,ज्ञानेश्वर सानप आदी मान्यवर उपस्थित होते.



