आंदोलन
आकारी पडीत शेतकऱ्याने आंदोलन अखेर सुरू!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पडीत नऊ गावांच्या वतीने शेतकरी संघटना व आकारी पडित शेतकरी संघटना यांचे वतीने प्रलंबित मागण्यासाठी आज शुक्रवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता ॲड.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर,’शेतकरी मेळावा व अन्नत्याग आंदोलन’ सुरू करण्यात आले असून त्यासाठी हरेगाव फाटा,महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हरेगाव मळा असा रॅली ने प्रवास करण्यात आला असून त्याला नऊ गावातील शेतकऱ्यांचा आपल्या ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले आहे.

“आकारी पडीत नऊ गावातील जमिनी परत देण्यासाठी आम्ही तीन दिवस सरकारची निर्णय घेण्याची वाट पाहत आहे.त्यानंतर आम्ही सदर शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःहून ताब्यात घेण्याची निर्णायक भूमिका घेणार आहे.त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची राहील”-ॲड.अजित काळे,उपाध्यक्ष,राज्य शेतकरी संघटना.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ०९ गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जवळपास सात हजार पाचशे एकर मूळ शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा आदेश १४ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऍड.अजित काळे यांच्या जनहित याचिकेच्या माध्यमातून दिला होता त्यात राज्य शासनाला गतवर्षी ०२ महिन्यात याबाबतचा कायदा करून मूळ मालकांच्या वारसांना जमिनी देण्याचे आदेशित केलेले असता त्यास जवळपास दोन वर्षे उलटत आले आहे तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली तर नाहीच उलट न्यायालयाचा आदेशाचा अवमान करत शेती महामंडळाने सदर चार हजार एकर जमिनी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना सार्वजनिक व खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचे प्रयोजन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यामुळे या नऊ गावातील शेतकऱ्यांत मोठा संताप व्यक्त होत आहे.परिणामी या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते.त्यात एप्रिल महिन्यात शेती महामंडळाच्या हरिगांव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव,वडाळा महादेव,ब्राम्हणगांव,उंदीरगांव,खैरी निमगांव,खानापूर,माळवाडगांव,मुठेवाडगांव या ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दि.२० मार्च रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर अँड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांचे उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आल्यानंतर संघटनेने जेलभरो आंदोलन केले होते.त्याची दखल राज्य सरकारने घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मध्यस्ती करत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना मुंबई येथे नुकतेच महसूलमंत्री बावनकुळे यांनी निमंत्रित केले होते.त्यावेळी हे 24 एप्रिल 2026 रोजी हे आश्वासन दिले होते मात्र ते सरकारने पाळले नाही.त्याला केराची टोपली दाखवली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत अच्छा-खाँसा संताप व्यक्त होत असून त्याला वाचा फोडण्याचे काम शेतकरी संघटना करत आहे.त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी हे उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.त्याला श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी संघटनांसह नऊ गावातील हजारो शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.या आंदोलनातील शेतकऱ्यानाच्या जवळपास दीड हजार हेक्टर जमीन निबे नामक खाजगी उद्योजकांना देण्याचा घाट घातला असून ही संतापजनक घटना घडली आहे.

दरम्यान आज अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान आम्ही तीन दिवस सरकारची निर्णय घेण्याची वाट पाहत आहे.त्यानंतर आम्ही सदर शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःहून ताब्यात घेण्याची निर्णायक भूमिका घेणार असल्याचे प्रतिपादन ॲड.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची राहील असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे जालना येथील नेते लक्ष्मणराव वडले,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुकाध्यक्ष अनिल जगताप,भाऊसाहेब काळे,आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित आहे.
दरम्यान यावेळी ॲड.अजित काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता,” शेंडी तुटो अथवा पारंबी ” आता माघार नाही अशी भूमिका घेतली आहे.त्यामुळे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र देण्याबाबत सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.आज दिवसभर शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी ठाण मांडले असून मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे.दरम्यान आज अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.



