जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात नवीन दवाखान्याचे उद्घाटन होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)  

   कोपरगाव येथील प्रसिद्धी कापड व्यापारी स्व.गोकुळचंद रूपचंद कोठारी यांचे नातु डॉ.प्रणव महेंद्र कोठारी यांच्या नूतन दवाखान्याचे उद्घाटन उद्या दि.15 ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता श्री लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,बागुल टॉवर्स शेजारी,बस स्टॅण्ड समोर,कोपरगांव संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात वैद्यकीय व्यवसायाने मोठी कात टाकली असून त्यात नवनवीन तंत्रज्ञानांची भर पडत असून नवीन होतकरू तरुण डॉक्टरांची भर पडत आहे.गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान,मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे मोठी कात टाकली आहे.त्यात आता डॉ.प्रणव महेंद्र कोठारी हे एक नाव आता उद्या सातंत्र्यदिनापासून नाव या यादीत समाविष्ट होत आहे.त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यात वैद्यकीय व्यवसायाने मोठी कात टाकली असून त्यात नवनवीन तंत्रज्ञानांची भर पडत असून नवीन होतकरू तरुण डॉक्टरांची भर पडत आहे.गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान,मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे मोठी कात टाकली आहे.पूर्वी साध्या उपचारासाठी बाहेर जावे लागायचे,मात्र आता ग्रामीण भागातील रुग्णांनाही स्थानिक पातळीवर उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत.कोपरगाव आणि परिसरात अनेक धर्मदाय संस्थांची रुग्णालये आहेतच पण आता शहरात अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि आयसीयू सुविधांनी युक्त अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरू झाली आहेत.हृदयविकार,अस्थिरोग,स्त्रीरोग,आणि शल्यचिकित्सा यांसारख्या विविध शाखांतील उच्चशिक्षित व अनुभवी डॉक्टर उपलब्ध आहेत.सीटी स्कॅन,एम.आर.आय,सोनोग्राफी आणि प्रगत प्रयोगशाळामुळे अचूक निदान वेळेत होते.चोवीस तास आपत्कालीन सेवा,ट्रॉमा केअर आणि अ‍ॅम्बुलन्स नेटवर्कमुळे गंभीर रुग्णांचे प्राण वाचवणे सोपे झाले आहे.पूर्वी या सेवांसाठी पुणे,नाशिक आणि मुंबईकडे धाव घ्यावी लागत होती.ती सोय आता कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध झाली आहे.त्यामुळे रुग्णांचा जीव आणि वित्त वाचण्यास मोठी मदत होत आहे.असेच डॉ.प्रणव महेंद्र कोठारी हे एक नाव आता उद्या सातंत्र्यदिनापासून नाव या यादीत समाविष्ट होत आहे.

डॉ.प्रणव कोठारी,कोपरगाव.

   दरम्यान या जनरल मेडिसीन विभागाचा उद्घाटन समारंभ कोपरगाव बेट राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते संपन्न होत आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे.विधान परिषदेचे आ.विवेक कोल्हे,गोदावरी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. डॉ.प्रणव कोठारी यांनी एम.बी.बी.एस.एम.डी.मेडिसन शिक्षण घेतले असून त्याचा लाभ हृदयरोग आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णासाठी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.योगेश लाडे आणि डॉ.प्रणव कोठारी यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close