गुन्हे विषयक
सोन्याची पोत ओढून चोरट्यांचा पोबारा,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन भुरट्या चोरट्यांनी दुचाकीवर येत एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन घेऊन निवारा कोपरगाव रोडने पोबारा केला असताना आज पुन्हा एक घटना उघडकीस आली असून यात फिर्यादी गृहिणी महिला साधणा प्रविण पापडीवाल (वय-60 ) रा.विवेकानंदनगर,कानडे बिल्डींग या सकाळी फिरत असताना महावितरण कंपनीच्या पॉवर हाऊस समोर दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत ओढून पोबारा केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा महिलांची साडेसाती सुरू झाल्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

कोपरगाव शहरातील फिर्यादी महिला साधना पापडीवाल या मॉर्निग वाक् करून घरी परतत असताना 6.15 वाजेचे सुमारास त्यांचे समोरुन एक मोटार सायकल आली त्यावर दोन इसम होते त्यापैकी मागे बसलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील जुनी वापरती सुमारे 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ओढुन घेतली त्यामुळे त्या खाली पडल्या होत्या.त्यानंतर त्या सुदेश टाकी कोपरगाव च्या दिशेने भरधाव वेगाने निघुन गेले असल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
कोपरगाव शहरात पुन्हा एकदा गळ्यातील सोन्याची पोत (मंगळसूत्र अथवा चैन) हिसकावून पळून जाण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे.वर्दळीच्या ठिकाणी महिलांना टार्गेट करून गुन्हेगार पसार होत आहेत.या वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून,सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.याबाबत कोपरगावचे आ.आशुतोष काळे सतर्क झाले असले तरी पोलिस अधिकारी सतर्क होणार का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.यापूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या काळात शहर आणि तालुक्यात कमालीचे गुन्हे वाढले होते.त्या बाबत आ.काळे यांनी हा प्रश्न उन्हाळी अधिवेशनात मांडला होता व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले होते.परिणामी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील पोलिस अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी त्याचे फळ म्हणून त्यांच्या हाती निरोपाचा नारळ ठेवला होता.आता शहर आणि तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही ठिकाणी पोलिस अधिकारी बदलले आहे.त्यामुळे परिणाम आवश्यक असताना त्यांना चोरट्यांनी पहिल्याच दमात वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.त्यात पहिल्या घटनेत चोरट्यांनी कोपरगाव येथील रहिवासी फिर्यादी महिला जया दिलीप शर्मा (वय -55) या गोकुळनगरी येथील खंदक नाल्याजवळील महावितरणच्या विद्युत रोहित्रा समोरील रोडवर समता बाल उद्यान येथुन आपल्या नातवाला घेवुन घराकडे जात असताना समोरुन एका मोटारसायकल वरुन दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन घेऊन निवारा कोपरगाव रोडने भरधाव वेगात निघुन पोबारा केला होता.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तोच दुसरी घटना नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कळवली आहे.
त्यात फिर्यादी महिला साधना पापडीवाल या मॉर्निग वाक् करून घरी परतत असताना 6.15 वाजेचे सुमारास त्यांचे समोरुन एक मोटार सायकल आली त्यावर दोन इसम होते त्यापैकी मागे बसलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील जुनी वापरती सुमारे 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ओढुन घेतली त्यामुळे त्या खाली पडल्या होत्या.त्यानंतर त्या सुदेश टाकी कोपरगाव च्या दिशेने भरधाव वेगाने निघुन गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मोटार सायकवरील दोन इसमांनी डोक्यात कॅप घातलेली व अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते व दोघांनीही तोंडाला रुमाल बांधलेला होता.मोटार सायकल वरील इसम हे भरधाव वेगात असल्याने त्यांना मोटार सायकलचे वर्णन सांगता आले नाही.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.या घटनेने महिला असुरक्षित वाटू लागले असून त्यांच्यात या चोरट्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणी चोरट्यांचा तातडीने शोध लावावा अशी मागणी महिलांनी आणि विविध संघटनांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना केली आहे.



