जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ज्ञानदेव कासार यांचे निधन

न्यूजसेवा


संवत्सर (वार्ताहर)


   कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील बिरोबा चौक परिसरातील रहिवासी व प्रगतशील शेतकरी व नामदेवराव परजणे पाटील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक ज्ञानदेव विनायक कासार पाटील यांचे काल रात्री ९.३० च्या सुमारास अत्पशा आजाराने निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा महेश कासार व तीन मुली,बंधू,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे अंत्यविधी समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व.ज्ञानदेव कासार यांचे छायाचित्र.

   

कै.ज्ञानदेव कासार हे राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांचे परमशिष्य होते.दूध उत्पादकांचे नेते नामदेवराव परजणे यांचे ते विश्वासू सहकारी कार्यकर्ते होते.कै.परजणे यांच्यासोबत त्यांनी संवत्सर गावातील विविध संस्था,सोसायट्या व शिक्षण समितीवर पदाधिकारी म्हणून कामकाज केलेले होते. 

  स्व.कासार यांचे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक कार्यात मोठे योगदान होते.स्व.ज्ञानदेव कासार यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे,दिलीप ढेपले,कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम,महेश परजणे,गोवर्धन परजणे,शिवाजी गायकवाड आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.अंत्यविधीसाठी संवत्सर पंचक्रोशीसह अहिल्यानगर,नाशिक,छत्रपती संभाजीनगर,पुणे जिल्ह्यातील नातेवाईक तसेच ग्रामस्थांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close