निवडणूक
शिवसैनिकांनी दक्ष राहण्याची गरज-सनस

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
भविष्यात खासदार,आमदारांची संख्या देखील वाढणार असून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर झाले आहे.पूर्वी एक लाखाची मतदार संख्या गृहीत धरून विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला होता.त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षानंतर एस.आय.आर.सुरु होणार असल्याने अशावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निवडणुकीचे माजी उपायुक्त अविनाश सणस यांनी एका बैठकीत बोलताना केले आहे.

“ज्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम राबवण्यात आली आहे.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या कमी झाली आहे;ती संख्या महाराष्ट्रात होऊ नये या हेतूने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.ही मोहीम सुरू असताना बी.एल.ओ.बरोबर काम करताना कार्यकर्त्यांनी देखील यात सहभागी झाले पाहिजे’-कमलाकर कोते,जिल्हाध्यक्ष,शिंदे सेना.
शिवसेना संघटनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसाठी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक शिर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडली आहे.त्या बैठकीत आगामी काळातील पक्षाचे नियोजन आणि संघटनात्मक बांधणीसाठी सेवानिवृत्त निवडणूक उपायुक्त अविनाश सनस यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी दिग्विजय पाटील,जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,उपजिल्हाप्रमुख शाम गोसावी,बाबासाहेब दिवे,विजय काळे,सागर बोठे,राहुल गोंदकर,अमोल लोंढे,पंकज शिंदे,नरेंद्र देशमुख,अमोल बानाईत,अक्षय सदाफळ,अशोक लोंढे,संतोष जाधव,अनिल पवार,हरिराम रहाणे, सोमनाथ महाले,अमोल बानाईत,अतुल कमलाकर कोते आदीसह बहुसंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपायुक्त सनस म्हणाले की,”एस.आय.आर.म्हणजे मतदार यादीची विशेष सखोल पुनर्वालोकन बी.एल.ओ.द्वारे केलेल्या मतदार यादीची पडताळणी आदीसह मतदार यादी अचूक अद्यावत आणि त्रुटी पासून मुक्त असल्याची खात्री करणे हा प्रमुख उद्देश असून मतदार यादीत परदेशातील बांगलादेशी लोक नसावेत.त्याबरोबरच त्यात पत्ता,वय,ओळख प्रमाणित करणे दुरुस्ती करणे वारंवार होणारे स्थलांतर परिणामी मतदार यादीत एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदणी काही लोक करतात.ती होऊ नये म्हणून ही मोहीम सुरू असताना कार्यकर्त्यांनी जागरूक राहावे हा या पाठीमागील हेतु असल्याचे सांगून यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.याबाबत कार्यकर्त्यांनी जागरूक राहून पक्षाच्या शाखा वाढवण्याबरोबरच भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत चांगले यश मिळाली पाहिजे यासाठी दक्षता घेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
यावेळी त्यांनी,”ज्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम राबवण्यात आली आहे.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या कमी झाली आहे ती संख्या महाराष्ट्रात होऊ नये या हेतूने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.ही मोहीम सुरू असताना बी.एल.ओ.बरोबर काम करताना कार्यकर्त्यांनी देखील यात सहभागी झाले पाहिजे.आपल्या भागातील कोणी मतदार कमी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.ज्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात याची अंमलबजावणी झाली आहे तिथे मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात ही मोहीम सुरू होत असताना ती संख्या कमी होणार नाही नागरिकांचे मतदार यादीत नाव कसे राहतील यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजेअसे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.



