जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराची चौकशी करा…या नेत्याच्या सूचना

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन जनतेची कामे मार्गी लावावी जे कामचुकार कर्मचारी असतील त्यांना चाप लावावा व ज्या ग्रामपंचायतीत गैरव्यवहार असतील त्यांची ताबडतोब चौकशी लावावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी आज संपन्न झालेल्या एका बैठकीत केल्या आहेत.

रांजणगाव देशमुख येथील कार्यकर्ते गजानन मते यांनी ग्रामविकास अधिकारी खेडकर यांची गंभीर तक्रार केली तो क्षण.

दरम्यान यावेळी पहिल्यांदा आ.आशुतोष काळे यांनी बैठकीवर चांगलीच पकड मिळवली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे काही अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले आहे तर काहीचे कान उपटले असल्याने प्रशासनावर चांगलाच धाक तयार झाला असल्याचे पहिल्यांदा दिसून आले आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रशासनावर अशीच पकड राहिली तर तालुक्यातील कामांना वेग आल्याशिवाय राहणार नाही अशी बोलकी प्रतिक्रिया उपस्थितांत उमटली आहे.

    जनता दरबार हा लोकप्रतिनिधी,मंत्री किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्या जागेवरच सोडवण्यासाठी भरवला जाणारा एक विशेष जनसंवाद उपक्रम मानला जातो.नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे न झिजवता थेट नेत्यांसमोर किंवा मंत्र्यांसमोर आपल्या तक्रारी मांडता येतात.यात बहुतांश जनता दरबारांमध्ये सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित असतात,ज्यामुळे समस्यांवर त्वरित तोडगा काढणे शक्य होते.लोकशाहीत जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत, यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.यामध्ये सर्वसामान्य,शेतकरी,ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते.तर जनतेला भर व्यासपीठावर उत्तर द्यावे लागत असल्याने अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यावर एक चाप राहतो.परिणामी ही पद्धत विशेष लोकप्रिय मानली जात आहे.कोपरगावात आज हा जनता दरबार मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयात ०८ महिन्यानंतर आज जनता दरबार घेतला होता.त्यानंतर आज कोपरगाव पंचायत समितीच्या सर्व विभागात नागरीकांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सोमवार दि.०८ रोजी दुपारी ०३ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत.

    कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या विविध विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयात ०८ महिन्यानंतर आज जनता दरबार घेतला होता.त्यानंतर आज कोपरगाव पंचायत समितीच्या सर्व विभागात नागरीकांना येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सोमवार दि.०८ रोजी दुपारी ०३ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत.

जनता दरबारात आ.आशुतोष काळे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेताना व सोबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व अन्य मान्यवर दिसत आहेत.

दरम्यान यावेळी सुरुवातीचा एक ते सव्वा तास तक्रारदार हे आपल्या तक्रारी मांडताना ध्वनिक्षेपकाचा वापर करत नसल्याने ते काय समस्या मांडत आहेत याचा माध्यमांना बोध होत नव्हता.त्यामुळे उपस्थित नागरिकही मागे आपापसात बोलून सदर बैठकीत व्यत्यय आणत असताना दिसत होते.आ.काळे यांना सभागृहात शांतता ठेवण्यासाठी वारंवार त्यासाठी सूचना कराव्या लागत असल्याचे दिसून येत होते.

    सदर प्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण,सुधाकर रोहोम,संचालक अरुण चंद्रे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,मधुकर टेके,माजी उपसभूती वाल्मीक कोळपे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,संभाजी काळे,कोपरगाव जीनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राहुल रोहमारे,श्रावण आसने,प्रशांत वाबळे,सरपंच प्रशांत घुले,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी,बांधकाम विभागाचे अभियंता एस. आर.दळवी,जलजीवन योजनेचे उपअभियंता रवींद्र पिसे,शिक्षण अधिकारी शबाना शेख,पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी डॉ.श्रद्धा काटे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी,राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

कोपरगाव येथील तहसीलच्या सभागृहात आयोजित उपस्थित नागरिक दिसत आहे.

    यावेळी आ.काळे यांनी कोपरगाव पंचायत समितीत एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून एक आदिल शेख नावाचा आरोपी मोकाट फिरत असल्याची तक्रार दाखल झाली आहे ही गंभीर बाब आहे.याची काळजी गटविकास अधिकारी यांनी घ्यायला हवी.अंचलगाव ग्रामपंचायत हद्दीत ६० हजारांचे बिल काढले असल्याच्या गंभीर तक्रारी दाखल आहे.त्याची चौकशी करावी असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.

   दरम्यान मायगाव देवी येथील ठेकेदाराने विहिरीचे काम पूर्ण न केल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या जाणवत असल्याने आ.काळे यांनी ठेकेदाराने असमर्थता दर्शवली त्यावेळी यांना चांगलेच झापले असून तुम्हाला होत नव्हते तर ते घेतलेच कशाला ? आता यापुढे तुम्ही ग्रामस्थांना स्वतः पाणी पुरवा” अशी खरडपट्टी काढली असल्याचे दिसून आले आहे.

   दरम्यान यावेळी आ.काळे यांनी बहादराबाद येथील ग्रामपंचायत अधिकारी अनिता दिवे यांना,” तुम्ही राजकीय पक्षाच्या आहेत का ? कोणत्या पक्षाचे काम करता ? असा सवाल केला त्यांनी नकार दिला असता त्यांनी मग तुमच्या वारंवार आणि खूप तक्रारी का येत आहे ? सर्वसमावेशक जनतेची कामे का करत नाही ? असा जाबसाल केला आहे.व यापुढे सर्व पक्षाच्या ग्रामस्थांची कामे करावी अशी तंबी दिली आहे.

   यावेळी रांजणगाव देशमुख येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन मते यांनी,” त्याच गावातील ग्रामपंचायत अधिकारी नारायण खेडकर हे वर्षे-वर्षे हातावर पैसे वापरत असून कर्मचारी परस्पर नागरिकांना नळजोडण्या देत असल्याचा आरोप केला आहे.ग्रामसेवक यांना काम करण्यास उत्साह दिसत नाही असा मते यांनी आरोप केला आहे.ग्रामपंचायत अधिकारी यांना काही विकास काम सांगितले की,ते त्यास नकार देऊन,” माझी बदली करा” असे सपशेल सांगून टाकतात असा आरोप केला आहे.त्यावेळी आ. काळे यांनी तुम्ही सुरेगाव येथे चांगले काम करत होता मग तुम्हाला रांजणगाव देशमुख येथेच काय झाले आहे असा सवाल केला आहे.

     यावेळी एका महिलेचे घरकुलाचे नाव सिस्टीम रिजेक्टेड मध्ये वगळले असल्याचे सांगितले त्यावेळी आ.काळे यांनी म्हणजे काय? असा सवाल गटविकास अधिकारी संदीप दळवी यांना केला ते म्हणाले,” ते मला माहिती नाही त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांची मदत घेतली.त्यांनी संकटमोचक बनून त्याची माहिती देताना,” ज्यांच्या घरी कार,घर,दूरचित्रवाणी संच,रिफ्रिजेटर,०५ एकर बागायती क्षेत्र आदी १६ प्रकारच्या सुखसोयी असतील त्यांची नावे आपोआप त्या ऍप मध्ये त्या लाभार्थ्यांचे नाव आपोआप वळगली जात असल्याचे सांगितले आहे.त्यावेळी त्याबाबत पुन्हा एकदा पडताळणीत सदर महिला बसते का याची खातरजमा करण्यास सांगितले आहे.

  यावेळी अनुसूचित जाती जमातीच्या ग्रामस्थांना घरकुलासाठी जागा मिळावी याची मागणी जेऊर पाटोद्याचे उपसरपंच भाऊसाहेब भाबड यांनी केली आहे.तर अनेक नागरिकांनी घरकुलाला वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.नागरिकांनी पंचायत समितीत वाळूची मागणी केली की,पंचायत समिती अधिकारी त्यांना महसूल विभागाची वाट दाखवत असून महसूल विभाग वाळूचा लिलाव झाला नसल्याचे सांगून आपले हात वर करताना दिसतं आहे.मात्र गोदावरी नदी पात्रातील वाळूचा यावर्षी लिलाव होऊनही तो ऐनवेळी रद्द झाल्याने नागरिकांची कुचंबना होत असल्याचे उघड झाले आहे.तर जप्त वाळू देण्याचा अधिकार महसूल विभागाला असून ते त्या ठिकाणी घरकुल धारकांना पाठवतात.मात्र वाळूचोर त्या जप्त वाळूपर्यंत लाभार्थ्याला पोहचू देत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी उपलब्ध झाल्या असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळं तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना,”बाप भीक मागू देऊना आणि आई जेऊ घालिना” अशी स्थिती उद्भवली असल्याचे उघड झाले आहे.परिणामी यावेळी घरकुलासाठी नागरिकांना वाळूच मिळत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आ.काळे यांचेकडे करण्यात आल्या आहेत.

   दरम्यान यावेळी सुरुवातीचा एक ते सव्वा तास तक्रारदार हे आपल्या तक्रारी मांडताना ध्वनिक्षेपकाचा वापर करत नसल्याने ते काय समस्या मांडत आहेत याचा माध्यमांना बोध होत नव्हता.त्यामुळे उपस्थित नागरिकही मागे आपापसात बोलून सदर बैठकीत व्यत्यय आणत असताना दिसत होते.आ.काळे यांना सभागृहात शांतता ठेवण्यासाठी वारंवार त्यासाठी सूचना कराव्या लागत असल्याचे दिसून येत होते.ध्वनिक्षेपक नादुरुस्त असल्याने त्यात व्यत्यय येत असल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close