कोपरगाव तालुका
…या अभियानातून नागरिकांनी आपले प्रश्न सोडवून घ्या-आ.कोल्हे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघात शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान विविध ठिकाणी संपन्न होणार असून,नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध महसूल विभागाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.विवेक कोल्हे यांनी नुकतेच केले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान नात फेरफार नोंदी,डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा/आठ-अ उतारे,उत्पन्न,रहिवासी,जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र,अकृषिक परवानगी,आणि पी.एम.किसान नोंदणी आदींचा समावेश असून याचे वितरण करण्यात येणार आहे.विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आ.विवेक कोल्हे यांनी याची सुरुवात केली आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान -2026 हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने सुरू केलेले एक महत्त्वाचे उपक्रम आहे.ज्याद्वारे लोकाभिमुख,कार्यक्षम व जलद सेवा देण्यासाठी ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन केले जाते.मार्च ते मे 2026 या काळात मंडळ स्तरावर राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत सातबारा दुरुस्ती,जातीचे दाखले,पी.एम.किसान यांसारख्या पंधरापेक्षा अधिक सेवा ‘एकाच दिवसात प्रदान केल्या जात आहे.या सेवा महसूल मंडळ,नगरपालिका आणि नगर पंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जात आहे.यात फेरफार नोंदी,डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा/आठ-अ उतारे,उत्पन्न,रहिवासी,जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र,अकृषिक परवानगी,आणि पीएम किसान नोंदणी आदींचा समावेश आहे.विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आ.विवेक कोल्हे यांनी याची सुरुवात केली आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

“संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत तब्बल ५४२ प्रकरणे पात्र-अपात्र निवडीसाठी तहसील कार्यालयात प्रलंबित असून या प्रकरणांची पात्रता व अपात्रता तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून केवळ समितीच्या बैठकी अभावी हि प्रकरणे प्रलंबित आहे.संबंधित लाभार्थ्यांना निर्णयाची प्रतीक्षा लागली असून ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत”-आ.विवेक कोल्हे,कोपरगाव.
दि.११ मे रोजी सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर शेजारी सभागृह,दहेगांव बोलका,पोहेगाव १० वाजता वक्रतुंड मंगल कार्यालय,त्याच प्रमाणे १५ मे रोजी कोपरगाव शहरात कलश मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.त्यात आपले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.दहेगाव बोलका महसूल मंडल विभागातील सर्व गावे,पोहेगाव महसूल मंडल विभागातील सर्व गावे आणि कोपरगाव शहर आणि कोपरगाव महसूल मंडलातील त्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहून त्यांचे प्रश्न मांडावे असे आवाहन आ.कोल्हे यांनी केले आहे.
महाराजस्व अभियानामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागणार नाहीत तसेच प्रशासन व जनतेमधील समन्वय अधिक मजबूत होणार आहे.गावपातळीवरच महसुली सेवा उपलब्ध होत असल्याने सामान्य नागरिक,शेतकरी,ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.



