जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

शालांत परीक्षेत…या शाळेचे मोठे यश !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड विद्यालयाचा शाळांत परीक्षा निकाल जाहीर झाला असून त्यात श्रद्धा सोमनाथ खरात हीने ७४.२०  टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तर शिवानी शांताराम गायकवाड हिने ६९.८० टक्के  गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर समृद्धी संजय रहाणे हीने ६९.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक राखला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांचा शालांत परीक्षेचा निकाल- २०२६ निकाल नुकताच जाहीर झाला असून यात या न्यू.इंग्लिश स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी ही यश संपादन केले आहे.

  दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे, आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड आणि संस्थेच्या सचिव चैताली काळे,सोसायटीचे सर्व विश्वस्त,निरीक्षक प्रा.नारायण बारे आदींनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close