आरोग्य
…या नगरसेविकेची आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका विजया संदीप देवकर यांची नुकतीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर जनआरोग्य समिती मध्ये अध्यक्षपदी निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.यापूर्वी देखील विजया देवकर यांनी नगरसेविका म्हणून काम केलेले आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही महाराष्ट्र शासनाची मोफत आरोग्य सेवा योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळ दर्जेदार उपचार,चाचण्या आणि औषधे मोफत उपलब्ध करून देते.राज्यात ७०० हून अधिक केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून,ती महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टी भागांत या दवाखान्यांची स्थापना करून राबवली जात आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही महाराष्ट्र शासनाची मोफत आरोग्य सेवा योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळ दर्जेदार उपचार,चाचण्या आणि औषधे मोफत उपलब्ध करून देते.राज्यात ७०० हून अधिक केंद्रे स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून,ती महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टी भागांत या दवाखान्यांची स्थापना करून राबवली जात आहेत.त्यातून नागरिकांना मोफत तपासणी,औषधे आणि निदानाचा लाभ देण्यात येत आहे.
कोपरगाव शहरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर येथे कोपरगाव जनआरोग्य समिती सदस्य निवड समारंभ नुकताच पार पडला आहे.महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका विजया संदीप देवकर यांची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संजयनगर जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान देवकर यांच्या निवडीबद्दल आ.विवेक कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,नगरसेवक आदींनी अभिनंदन केले आहे.



