जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेच्या विद्यार्थ्यांची एन.डी.ए,निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक एनडीए अकॅडमीने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.या अकॅडमीचा विद्यार्थी निखिल किरण देवरे यांने एस.एस.सी.टेक.एन्ट्री परीक्षेत लक्षवेधी यश मिळवीत भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदासाठी आपली जागा निश्चित केली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आत्मा मालिक एनडीए अॅकाडमीत मला शिस्त,ध्येय निश्चीती आणि कठोर परिश्रम करण्याचे धडे मिळाले.हि देशपातळीवरील एक उत्तम अॅकादमी आहे.माझ्या यशात या अॅकादमीचे महत्वाचे योगदान आहे"-कॅडेट निखिल किरण देवरे(लेफ्टनंट ).


  

   आता कॅडेट निखिल गया येथे आॅफीसर्स ट्रेनींग अॅकाडमीत ४९ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर तो सैन्यदलात लेफ्टनंट पदावर रूजू होईल.याबाबत माहीती देताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकूमार सूर्यवंशी म्हणाले,आत्मा मालिक एनडीए अॅकाडमीत अनुभवी प्रशिक्षक आहेत.आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.सैन्यदलातील विवीध पदांच्या परिक्षेत येथील विद्यार्थी सातत्याने यश संपादन करीत असतात.निखील देवरे यांच्या लेफ्टनंट पदाच्या निवडीमुळे आत्मा मालिक एनडीएच्या अॅकाडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,वसतीगृह व्यवस्थापिका माई पटेल माई आदिंनी निखील चे अभिनंदन केले आहे.

   कॅडेट निखिल किरण देवरे(लेफ्टनंट ) आत्मा मालिक एनडीए अॅकाडमीत मला शिस्त,ध्येय निश्चीती आणि कठोर परिश्रम करण्याचे धडे मिळाले.हि देशपातळीवरील एक उत्तम अॅकादमी आहे.माझ्या यशात या अॅकादमीचे महत्वाचे योगदान आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close