जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या तालुक्यात पती पत्नीस लुटले,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात सुमारास विरार येथून रात्री निघून पहाटे शिर्डीस साईबाबांच्या दर्शनाला जात असताना अज्ञात चोरट्यांनी आपल्या बजाज पल्सर या दुचाकीचा वापर करून बंदुकसदृश वस्तूचा वापर करून धमकावत आमचे कडील एक सोन्याची साखळी,व दोन भ्रमणध्वनी असा सुमारे 57 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी अजित बुधाजी तोरसकर (वय-28) दाखल झाला असल्याने शिर्डी येथे येणारे साईभक्त आणि प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान यातील चोरट्यांचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे होते.त्यातील एकाने काळ्या रंगाचा टि शर्ट अंगात घातलेला होता.त्याची उंची अंदाजे पाच फुट होती.त्याने प्रेन्च कट दाढी केलेली होती तर डोक्यावर केस लांब व डोक्यावर बुचडा बांधलेला होता.त्यातील दुसरा इसम हा अंदाजे 25 ते 30 वय वर्षांचा होता त्याचे अंगात पांढ-या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती.त्याचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे होते.त्याने काळ्या रंगाचा टि शर्ट अंगात घातलेला होता.त्याची उंची अंदाजे 5.5 होती.तो मध्यम बांध्याचा सावळ्या रंगाचा होता.

     कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत असताना दिसत आहे.त्यामुळे सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे.अवैध वाळू उपशाच्या प्रश्नाने तर नेते आणि प्रशासनाच्या डोक्यावरून पाणी फिरले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे हे अलीकडील काळात सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत आहे.मात्र तरीही प्रशासन जागचे हलायला तयार असल्याचे दिसत नाही.त्यामुळे संतप्त होऊन आ.काळे यांनी या प्रश्नावर मार्च महिन्यात संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला असल्याचे दिसून आले होते.तर रवंदे येथील ग्रामस्थानी एक ग्रामसभा घेऊन अवैध व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव तालुक्यातील जुना शिर्डी नाशिक मार्गावर घारी शिवारात समृद्धीच्या पुलाजवळ पहाटेच्या सुमारास विरार येथील एक जोडपे आपल्या दुचाकीवरून रात्री 8.30 वाजता निघाले होते.

  त्यांनी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला येत असताना रात्री त्यांनी जेवण करून पुढे जात असताना घारी शिवारात समृद्धीचे पुलाजवळ वळणावर एका दुचाकी वरून तीन आरोपी त्यांचा पाठलाग करत आले होते.त्यांनी मागे बसलेल्या फिर्यादीच्या पत्नीचे खांद्यावरून बॅग हिसकावून घेतली होती.दरम्यान फिर्यादीचा तोल गेल्याने त्यांनी आपली दुचाकी थांबवली असता चोरट्यांनी त्यांना बंदूक सदृश वस्तूचा धाक दाखवून व त्यांची दुचाकी आडवी घालून फिर्यादीचा व त्यांचे पत्नीचा असे ओपो आणि आय फोन कंपनीचे दोन मोबाईल हिसकावून घेतले व त्यांच्या गळ्यातील एक सोन्याची साखळी असा जवळपास 57 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला असून घटनास्थळावरून पोबारा केला आहे.त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली आहे.त्यांनी अन्य स्थानिक नागरिकांची मदत घेऊन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान यातील चोरट्यांचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे होते.त्यातील एकाने काळ्या रंगाचा टि शर्ट अंगात घातलेला होता.त्याची उंची अंदाजे पाच फुट होती.त्याने प्रेन्च कट दाढी केलेली होती तर डोक्यावर केस लांब व डोक्यावर बुचडा बांधलेला होता.त्यातील दुसरा इसम हा अंदाजे 25 ते 30 वय वर्षांचा होता त्याचे अंगात पांढ-या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती.त्याचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे होते.त्याने काळ्या रंगाचा टि शर्ट अंगात घातलेला होता.त्याची उंची अंदाजे 5.5 होती.तो मध्यम बांध्याचा सावळ्या रंगाचा होता.तसेच मोटार सायकल चालवणारा इसम हा अंदाजे 30 ते 35 वयाचा होता.त्याचे अंगात लाल रंगाचा टि-शर्ट,पॅन्ट काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट जाडसर बांध्याचा तर त्याचा रंग निमगोरा असलेला होता अशी माहिती दिली आहे.त्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close