जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

साईभक्तांसाठी जवळच्या ठरणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटींची तरतूद !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

         मुंबई,ठाणे,नाशिक आणि गुजरात येथील साई भक्ताना शिर्डीला जाण्यास सर्वात जवळचा ठरणारा सायाळे,जवळके मार्गे रस्त्यासाठी तसेच ओझर ते शिर्डी विमानतळासाठी वेगवान ठरणाऱ्या १० मीटर रुंद मार्गासाठी सरकारने आगामी सिंहस्थ पर्वणीतून २१३.५७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे जवळके जनमंगल ग्रामविकास संस्थेसह सायाळे,बहादरपूर,वेस,धोंडेवाडी,दुशिंगपूर,डोऱ्हाळे,काकडी,मल्हारवाडी आदी गावातील ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

 

दरम्यान हा रस्ता वर्तमानात ५.५० मीटर रुंदीचा असून तो आता तब्बल १० मीटर रुंदीचा होणार आहे.त्यामुळे ओझर विमानतळ ते शिर्डी काकडी विमानतळ या मार्गाने प्रवाशांना केवळ दोन तासात पोहचता येणार आहे.जुन्या रस्त्यांना त्यासाठी तब्बल तीन तास वेळ खर्ची पडत होता.या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदींचे आभार मानले आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”जवळके मार्गे मुंबई,ठाणे,कल्याण,नाशिक,गुजरात येथून शिर्डीला येणाऱ्या साईभक्ताना हा सर्वात जवळचा ठरत आला आहे.आगामी वर्षात नाशिक येथे संपन्न होणाऱ्या सिंहस्थ काळात राज्य व केंद्र सरकारने नजिकचे तीर्थक्षेत्र आणि देवस्थाने जोडण्यासाठी जवळपास ३० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.तर शिर्डीसाठी नांदुर,निमोण,तळेगाव दिघे,लोहारे,निर्मळ पिंपरी मार्गे शिर्डीसाठी आर्थिक तरतुद केली होती.मात्र शिर्डीसाठी सर्वात जवळचा ठरणारा व दुष्काळी बंगला वरदान ठरणारा हा मार्ग वळगला होता.पूर्वी हा मार्ग जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी १९९५ साली जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते.तत्कालीन युती सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री स्व.अशोकराव डोणगावकर यांचे सहकार्याने जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते.आणि त्याला यश आले होते.त्यानंतर हा रस्ता डांबरीकरण होऊ लागला होता.त्यानंतर या रस्त्यावरून शिर्डीसाठी जाणाऱ्या पालख्या आणि प्रवासी वाहने सर्वाधिक संख्येने जात असतानाही शिर्डी येथील साईबाबा संस्थानकडे जनमंगल ग्रामविकास संस्थेने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते.सन-२०१५-१६ साली माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे सहकार्याने केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमातून संस्थेने दहा कोटी रुपयांचा निधी आणला होता.त्यामुळे हा रस्ता दुपदरी झाला होता.मात्र सिंहस्थ पर्वणीतून या रस्त्यासाठी मात्र एक फुकटी कवडीची तरतूद झाली नव्हती.त्यामुळे दुष्काळी भागातील ग्रामस्थानी संताप व्यक्त केला होता.या रस्त्यानजिक असलेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभांचे ठराव घेऊन सरकारकडे या रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती.सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत लोकप्रतिनिधींचे वारंवार लक्ष वेधून घेऊनही उपयोग झाला नव्हता.त्याबाबत वृत्तपत्रात आणि सामाजिक माध्यमांत अनेक वेळा टीका करण्यात आली होती.अखेर या लढयाला यश आले असून यासाठी सरकारने हा मार्ग ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या मार्गात ८५.५० किमीचा रस्ता समाविष्ट करून त्यासाठी २१३.५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.याबाबतचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

जवळके मार्गे शिर्डी या रस्त्यावरून शिर्डीसाठी जाणाऱ्या पालख्या आणि प्रवासी वाहने सर्वाधिक संख्येने जात असतानाही शिर्डी येथील साईबाबा संस्थानकडे जनमंगल ग्रामविकास संस्थेने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते.सन-२०१५-१६ साली माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे सहकार्याने केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचे माध्यमातून संस्थेने दहा कोटी रुपयांचा निधी आणला होता.त्यामुळे हा रस्ता दुपदरी झाला होता.

   दरम्यान हा रस्ता वर्तमानात ५.५० मीटर रुंदीचा असून तो आता तब्बल १० मीटर रुंदीचा होणार आहे.त्यामुळे ओझर विमानतळ ते शिर्डी काकडी विमानतळ या मार्गाने प्रवाशांना केवळ दोन तासात पोहचता येणार आहे.जुन्या रस्त्यांना त्यासाठी तब्बल तीन तास वेळ खर्ची पडत होता.या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदींचे आभार मानले आहे.

   दरम्यान या निधीमुळे कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे,एस.के.थोरात,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,विलास डांगे,बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,माजी सरपंच माणिक दिघे,तानाजी शिंदे,सरपंच सारिका विजय थोरात,राजेंद्र नेहे,माजी सरपंच वसंत थोरात,डी.के.थोरात,नवनाथ शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात,रखमा वाकचौरे,एकनाथ थोरात,विठ्ठल थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,चंद्रकांत थोरात,गोरक्षनाथ वाकचौरे आदींनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close