जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चांगदेवराव भोसले यांचे निधन

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रामवाडी परिसरातील रहिवासी चांगदेवराव माधवराव भोसले यांचे वृध्दापकाळाने बुधवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता निधन झाले.मृत्युसमयी ते ७० वर्षाचे होते.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.चांगदेवराव भोसले यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कै.चांगदेवराव भोसले यांचा राजकीय क्षेत्रात फारसा सहभाग नसला तरी सामाजिक व धार्मिक कार्यात ते सतत सहभागी होत असत.मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा जनसमुदाय मिळविला होता.प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली होती.

   कै.चांगदेवराव भोसले यांच्या पश्चात पत्नी,बाबासाहेब भोसले व प्रभाकर भोसले ही दोन मुले व जयश्री संजय वाघ मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे यांनी कै.चांगदेवराव भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.या अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,नातेवाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close