जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात दोन गटात मारहाण,तीन गंभीर जखमी!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या दत्तनगर येथील दोन गटात नाजूक कारणावरून दोन गटात चाकूच्या सहाय्याने जोरदार मारहाण झाली असून यात फारुक फकिरा मोहंमद शेख,आयान फारुक शेख,मदिना फारुक शेख आदी तीन जण जखमी झाले असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.याबाबत फिर्यादी रिहान फारुक शेख (वय-20) रा.दत्तनगर यांनी तन्वीर सिकंदर बागवान,सिकंदर वाहिद  बागवान,साबीर सिकंदर बागवान या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

“कोपरगाव शहर आणि तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडली असून आरोपींवर पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नसल्याचा आरोप करून तालुक्यात वाळूचोर,अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.गावठी कट्टे गल्लीबोळात दिसून येत आहे.याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेणार असून कारवाई करण्यास भाग पाडणार आहे”-योगेश वाणी,निष्ठावान कार्यकर्ते,भाजप.

   कोपरगाव शहरात शांतता भंग करण्याच्या घटनात वारंवार वाढ होताना दिसून येत आहे.आरोपींना कायद्याचा धाक राहिला का ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.याबाबत कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तक्रारी करूनही काही उपयोग होताना दिसून येत नसल्याचे दिसत आहे.अशीच एक गंभीर घटना नुकतीच उघड झाली असून यात फिर्यादी आणि आरोपी यांच्यात एक नाजूक प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे.त्यात आरोपीं तन्वीर सिकंदर बागवान,सिकंदर वाहिद  बागवान,साबीर सिकंदर बागवान या तिघांविरुद्ध दिनाक 16 एप्रिल रोजी रात्री 08 वाजता फिर्यादीचे दत्तनगर येथील गल्लीत एका नाजूक बाबतीत संपर्क साधण्यास नकार दिला होता.त्यातून हा वाद निर्माण झाला आहे.त्यातून आरोपींनी फिर्यादीचे वडील,भाऊ,साक्षीदार आदींना चोपरच्या सहाय्याने डोक्यात,मानेवर,कानावर वार करून फिर्यादी आणि त्याचे नातेवाईकांना गंभीर जखमी केले आहे.त्यात फिर्यादीची आई मध्ये आली असता तिला देखील मारहाण केली असल्याचा आरोप आहे.

   दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,उपनिरीक्षक दिपक रोठे आदींनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.यातील गंभीर जखमी असलेल्या फारुक फकिरा मोहंमद शेख,आयान फारुक शेख,मदिना फारुक शेख आदी तीन जणांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.त्यांची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे जीवावर बेतले होते अशी माहिती हाती आली आहे.मात्र ते बोटावर निभावले असल्याचे मानले जात आहे.

   दरम्यान याबाबत शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंदणी क्रमांक क्रं.-205/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109(1),118(2),115,351(3)(5) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षिक दीपक रोठे हे करीत आहेत.

   दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बिघडली असून आरोपींवर पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नसल्याचा आरोप करून तालुक्यात वाळूचोर,अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.गावठी कट्टे गल्लीबोळात दिसून येत आहे.याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेणार असून कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी पदाधिकारी योगेश वाणी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close