निवड
माजी आ.कडू कडून…या वकिलांचा गौरव !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने कोपरगांव तालुका कोर्टातील विधिज्ञ योगेश खालकर यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाचे अध्यक्ष माजी आ.बच्चू कडू यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ॲड.योगेश खालकर यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध प्रश्नाना वेळोवेळी वाचा फोडली आहे.ते अहिल्यानगर,नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी गेलेल्या गेलेल्या निळवंडे धरणाचे कालवे करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या निळवंडे कालवा कृती समितीत सक्रिय कार्यकर्ते गणले जातात.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था राज्य स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता २ दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली असून यावेळी ज्युनिअर कॉलेज व प्रहार करिअर अकॅडमी नवीन वास्तू उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे.त्यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला आहे.त्यात कोपरगाव येथील वकील संघाचे अध्यक्ष ॲड,योगेश खालकर यांचा गौरव करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ॲड.खालकर यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध प्रश्नाना वेळोवेळी वाचा फोडली आहे.ते नाशिक नगर जिल्ह्यातील दुष्काळी गेलेल्या गेलेल्या निळवंडे धरणाचे कालवे करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या निळवंडे कालवा कृती समितीत सक्रिय कार्यकर्ते गणले जातात.त्यांनी तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची झालेली दुरावस्थेकडे विविध आंदोलने करून राजकीय नेते आणि प्रशासन यांचे लक्ष वेधून घेतले आहे.



