जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पणन

मंत्र्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात काळे-कोल्हेंचा शिमगा…!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आज दुपारी १.३० वाजता आयोजित केलेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन भूमिपूजन कार्यक्रम अडचणीत सापडला असून या कार्यक्रमावर आ.आशुतोष काळे आणि गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या गटाने बहिष्कार टाकला असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या कार्यक्रमाकडे कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या,’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’
भूमिपूजन कार्यक्रमास राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे येत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच निमंत्रण दिले गेले नाहीच पण उलट निमंत्रण पत्रिकेत त्याची साधी दखल घेतली गेली नाही.परिणाम जो व्हायचा तो झाला असून गोदावरी परजणे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे गटाने या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला तीच बाब आ.काळे गटाला झोंबली असून माजी आ.अशोक काळे यांची सेवाज्येष्ठता डावलून बिपीन कोल्हे यांचे नाव वर घेतल्याने कहर झाला आहे.

  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध संपन्न झाल्यापासून गेली अडीच वर्षे ही बाजार समिती कायम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.विविधि विकास कामे आणि त्यांचा दर्जा,काढलेली बिले,मंजूर केलेली वादग्रस्त विकास कामे,जवळके येथील उपबाजार रद्द करून तो नंतर राजनगाव देशमुख येथे देणे व ते सुरू होत नाही तोच पुन्हा पोहेगाव येथे खिरापतीसारखा वाटणे आदी निर्णय वादग्रस्त ठरले आहे.आता ते कमी की काय आता आज दुपारी संपन्न होत असलेल्या १.५० कोटी रुपये खर्चाच्या,’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ भूमिपूजन कार्यक्रम चुकीच्या निमंत्रण पत्रिकेवरून वादात अडकला आहे.त्या भूमिपूजन कार्यक्रमास राज्याचे पणन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे येत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाच निमंत्रण दिले गेले नाहीच पण उलट निमंत्रण पत्रिकेत त्याची फोटो किंवा नावाची साधी दखल घेतली गेली असल्याचे दिसून आले नाही.परिणाम जो व्हायचा तो झाला असून गोदावरी परजणे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे गटाने या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला असून तसे पत्रच त्यांचे संचालक खंडू फेफाळे व लक्ष्मण शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी दिले आहे.त्याला त्यांच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

  

दरम्यान एका घटनाक्रमात माजी आ.कोल्हे गटाच्या एका नुकत्याच कोपरगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या मात्र ठेकेदारीत जम बसवलेल्या कार्यकर्त्याने आ.काळे गटाच्या एका संचालकास मधाचे बोट दाखवत साधू-प्रसाद दिल्याने काळे गटाच्या संचालकांची संख्या घटण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.
त्यामुळे त्यांना जोखीम पत्करणे अडचणीचे ठरत असल्याचे दिसत आहे.

  दरम्यान या घटनेचे पडसाद आ.काळे या गटात न उमटले तर नवल होते.निमंत्रण पत्रिकेत सेवा ज्येष्ठता डावलून माजी आ.अशोक काळे यांचे नाव खालील बाजूस टाकले असल्याचे निदर्शनास आले आहे.तर कुठल्याही वैधानिक पदावर नसताना संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत असल्याचा आरोप आ.काळे गटाने केला आहे.तर माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचा ज्येष्ठतेचा क्रम डावलला गेला असल्याचा त्यांचे संचालकांचा आरोप आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांचे ही बाब काही संचालकांनी लक्षांत आणून दिल्यावर त्यांनी आपल्या काही संचालकांना बोलावून घेऊन त्यांची कानउघडणी केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्याचे पडसाद काल सायंकाळी संपन्न झालेल्या प्रसाद नाईक हे संचालक असलेल्या येवला रोड लगत असलेल्या ‘रचना स्क्वेअर ‘ या कमर्शियल बिल्डिंगच्या उद्घाटन कार्यक्रमात उमटले असल्याचे दिसून आले आहे.त्या बाबत आमचे प्रतिनिधीने सविस्तर वृत्त रात्रीच प्रसिद्ध केले आहे.त्यामुळे हा वाद आता आगामी काळात कोणते रूप घेणार याकडे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

  

दरम्यान अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत सभापतीपद हे अडीच वर्षांनी खांदेपालट करून कोल्हे गटाकडून आ.काळे गटास देण्याचे निश्चित झाले होते.मात्र ०५-०६ महिन्यापूर्वी कालावधी संपवूनही कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम हे खुर्चीला वेटोळे घालून बसल्याने मोठा पेच निर्माण झाला असल्याचे मानले जात आहे.परिणामी काळे गटाच्या संचालकांची सभापती पदाची संधी हुकून चालली असल्याचे समजत आहे.त्यामुळे अस्वस्थता वाढली असल्याचे मानले जात आहे.

   दरम्यान कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पावणेतीन वर्षापूर्वी संपन्न होऊन त्यात माजी आ.कोल्हे गटाचे ०८ आ.आशुतोष काळे गटाचे ०६,राजेश परजणे गट व नितीन औताडे गटाचे प्रत्येकी ०२ संचालक बिनविरोध निवडून आले होते.व्यापारी संचालक प्रत्येकी एक दोन्ही प्रमुख गटात सामील आहे.दरम्यान सभापतीपद हे अडीच वर्षांनी खांदेपालट करून आ.काळे गटास देण्याचे निश्चित झाले होते.मात्र ०५-०६ महिन्यापूर्वी कालावधी संपवूनही कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम हे खुर्चीला वेटोळे घालून बसल्याने मोठा पेच निर्माण झाला असल्याचे मानले जात आहे.परिणामी काळे गटाच्या संचालकांची संधी हुकून चालली असल्याचे समजत आहे.त्यामुळे हा वाद उफाळला असल्याचे मूळ कारण असल्याची माहिती आहे.

   दरम्यान या घटनाक्रमात माजी आ.कोल्हे गटाच्या एका नुकत्याच कोपरगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या मात्र ठेकेदारीत जम बसवलेल्या कार्यकर्त्याने आ.काळे गटाच्या एका संचालकास मधाचे बोट दाखवत साधू-प्रसाद दिल्याने काळे गटाच्या संचालकांची संख्या घटली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे त्यांना हातावर हात चोळण्याशिवाय पर्याय राहिला नाही अशी आतल्या गोटातील माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे आगामी काळ कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मोठा धामधुमीचा राहणार हे ओघाने आलेच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close