कोपरगाव शहर वृत्त
…या व्यापारी महासंघाची पदाधिकारी निवड जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाली असून यात पुन्हा एकदा त्याच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यात अध्यक्षपदी ओमप्रकाश कोयटे तर कार्याध्यक्षपदी अजित लोहाडे व सुधीर डागा यांची वर्णी लागली आहे.

नूतन पदाधिकारी दिसत आहे.
दरम्यान येत्या २४ मे रोजी तालुक्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘गाव तेथे उद्योजक’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याच दिवशी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या माध्यमातून वर्तमान अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे किराणा दुकानदारांपासून ते शहरातील छोटे-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी विविध योजना,सवलती व मार्गदर्शन करून त्यांना सक्षम बनविण्याचे काम काम करण्यात आले आहे.तसेच बाजारपेठ फुलविण्यासाठी ही त्यांचे योगदान मानले जाते.त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.दरम्यान याच बैठकीत उद्योजक संजय भन्साळी व एस.जे.एस.हॉस्पिटलचे संचालक चांगदेव कातकडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.तर यश विसपुते यांची संचालक म्हणून कार्यकारिणीत नवनियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान,येत्या २४ मे रोजी तालुक्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘गाव तेथे उद्योजक’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याच दिवशी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती महासचिव प्रदीप साखरे यांनी दिली आहे.
सदर कार्यकारिणीत महासचिव पदी प्रदीप साखरे,उपाध्यक्ष म्हणून राजकुमार बंब,नारायण अग्रवाल,संजय भन्साळी,केशव भवर,आशुतोष पटवर्धन,खजिनदार तुलसीदास खुबाणी,सचिव गुलशन होडे,सहसचिव महावीर सोनी व किरण शिरोडे आदींचा समावेश असून संचालक मंडळात कृष्णाशेठ उदावंत,योगेश बागुल,बबलु वाणी,चेतन खुबाणी,सुमित भट्टड,शरद खरात,दिपक गुजराथी,हेमचंद्र भवर,संजय दुशींग,संदीप काबरा,युवराज गांगवे,आनंद लोढा,प्रमोद मुंदडा,अक्षय सोनेकर यांची निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या युवा आघाडीच्या समन्वयक पदी हर्षल कृष्णानी,मानव शुक्ला,धीरज कराचीवाला,यश विसपुते,अक्षय गिरमे,गोल्डी शिरोडे यांची या बैठकीत निवड करण्यात आलीआहे.



