जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या शाळेला मोठी देणगी !

न्यूजसेवा
धानोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार गावचे रहिवासी व महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव तसेच विजय जाधव यांच्या मातोश्री स्व.लीलाबाई पंडितराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त जाधव परिवाराकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवीभुसार शाळेला एक्कावन्न हजार रुपयांची मदत करून समाजापुढे आदर्श ठेवला असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“आपल्या सांगवी भुसार गावची शाळा ही अग्रेसर रहावी म्हणून माई जाधव या नेहमी प्रेरणा देत असत सांगवी भुसार शाळा ही आगामी काळात शताब्दीकडे वाटचाल करत असताना समाजाने पुढाकार घ्यावा व आपल्या शाळेचा कायापालट करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू”- राजेंद्र जाधव,उपाध्यक्ष,महानंद,मुंबई.
महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या मातोश्रीं लीलाबाई जाधव यांचे मागील वर्षी निधन झाले होते.त्यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न आला आहे.त्यावेळी त्यांनी या नवीन उपक्रम राबवला आहे.
याप्रसंगी बोलताना राजेंद्र जाधव यांनी सांगीतले की,”माई नेहमी शाळा,शिक्षण,शालेय उपक्रम,गाव,याविषयी,” आपल्या सांगवी भुसार गावची शाळा ही अग्रेसर रहावी म्हणून नेहमी प्रेरणा देत असत सांगवी भुसार शाळा ही आगामी काळात शताब्दीकडे वाटचाल करत असताना समाजाने पुढाकार घ्यावा व आपल्या शाळेचा कायापालट करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी तालुक्याचे आ.आशुतोष काळे,माधवराव माणिकराव देशमुख,साधनाताई संजय जाधव,विजय जाधव,सुधीर पाटील,अनिल सोनवणे,अलका जाधव,रोहीणी देशमुख,राजश्री जाधव,विद्याताई सोनवणे,जीवन जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सदस्य शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विविध मान्यवर उपस्थित होते.



