शैक्षणिक
स्व.रोहमारे स्मृति-करंडक…या संघाने पटकावला !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या के.बी.रोहमारे स्मृति-करंडक माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय,छ.संभाजीनगरच्या आदित्य दराडे व वैभव बंगाळे या संघाने सर्वाधिक गुण मिळवून पटकावला आहे.या संघाला रोहमारे स्मृति-करंडक व रोख रुपये २ हजार १०० तसेच इतर वरिष्ठ व कनिष्ठ दोन्ही गटातील वैयक्तिक पारितोषिके सुधीर डागा व संदीप रोहमारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान यावेळी पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धकांचे अभिनंदन करताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी आपले आजोबा कै.के. बी.रोहमारे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग,सामाजिक शास्र मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच तीन दिवसीय के.बी.रोहमारे स्मृति-व्याख्यानमाला संपन्न झाली आहे.त्यात त्यांना हे यश मिळाले आहे.
दरम्यान वैयक्तिक प्रथम क्रमांक रुपये ७ हजार आदित्य दराडे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय,संभाजीनगर),वैयक्तिक द्वितीय क्रमांक रुपये ५ हजार मेघा सोनवणे (के. जे.सोमैया महाविद्यालय कोपरगाव) तृतीय क्रमांक रुपये ३ हजार आकांक्षा नरवडे (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय,मंचर,पुणे) यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रुपये १ हजार ईश्वरी निंबाळकर (सुशीलामाई काळे महाविद्यालय,कोळपेवाडी) व वैभव बंगाळे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय,संभाजीनगर) यांनी पटकावले आहे.
दरम्यान कनिष्ठ गटातील वैयक्तिक पारितोषिके प्रथम रुपये ४ हजार माएशा फैयाज शेख (श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,श्रीगोंदा) द्वितीय रुपये ३ हजार अंजली निलेश चिखले (के.बी.रोहमारे महाविद्यालय कोपरगाव) तृतीय रुपये २ हजार राजवीर कैलास खरारे (उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा पाचोरा,जळगाव) तर उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रुपये ५०० व दर्शन विजय चौधरी (अगस्ती कनिष्ठ महाविद्यालय,अकोले) ईश्वरी विजय वाकचौरे (एस.एस.जी.एम.कनिष्ठ महाविद्यालय,कोपरगाव) यांनी पटकाविलेआहे.
याशिवाय वरिष्ठ गटातील ऋतुजा बनकर (अगस्ती महाविद्यालय,अकोले) व आश्विनी सांगळे (एन.पी.विधी महाविद्यालय,कोपरगाव) तसेच कनिष्ठ गटात पूनम गायकवाड व प्रतीक्षा धोत्रे (विनायकराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय,वैजापूर) या स्पर्धकांना प्रत्येकी रुपये ५०० ची विशेष पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुणे,नाशिक,जळगाव,धुळे,छ.संभाजीनगर,नांदेड,सांगोला आदी जिल्ह्यातील 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
सदर प्रसंगी सुधीर डागा,प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,परीक्षक डॉ.बळीराम धापसे,प्रा.सुनील कांडेकर,प्रा.अमोल चिने व प्रा.जावेद शहाआदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेचे समन्वयक डॉ.जिभाऊ मोरे व सह समन्वयक डॉ.रवींद्र जाधव यांनी प्रास्तविक केले तर प्रा.ए.एफ.सूर्यवंशी व प्रा.आर.जी.मरभळ यांनी सूत्रसंचालन केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.बी.बी.भोसले,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,डॉ.संतोष पगारे, डॉ.वासुदेव साळुंके,डॉ.महारुद्र खोसे,डॉ.नामदेव ढोकळे,डॉ.संजय दवंगे,रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे इतर प्राध्यापक आदींनी परिश्रम घेतले आहे.



