जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात नविन कोर्सचे उद्घाटन !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व वाणिज्य शाखेच्या अंतर्गत बजाज बजाज फिन्सर्वच्या वतीने सीएसआर पुरस्कृत ची सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग,फायनान्स अँड इन्शुरन्सचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कॅम्पसमध्ये सहभागी विद्यार्थी दिसत आहेत.

“बजाज फिन्सर्वच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी अंतर्गत विविध महाविद्यालयातील युवा पिढीला शिक्षणासोबतच बँकिंग,फायनान्स व इन्शुरन्स क्षेत्रातील ज्ञान कौशल्य व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचे कामही दिले जाते”-विकास करंजीकर,प्रमुख प्रशिक्षक.


  महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ निवडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विविध चाचण्यांतून निवड करतात त्यालाच कॅम्पस प्लेसमेंट म्हटले जाते.कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यास त्याच्या करिअरची उत्तम सुरुवात होते.अभियांत्रिकीसारख्या कोर्सेसमध्ये वार्षिक ३ ते ३० लाखापर्यंतचे वेतन असलेले जॉबदेखील विद्यार्थ्यांना मिळाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.मात्र कॅम्पस प्लेसमेंटमधून चांगली नोकरी न मिळाल्यास विद्यार्थ्यांना स्वतःच प्रयत्न करून जॉब मिळवताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच कमी पगाराची नोकरी व कमी प्रतीचे काम करण्याची तयारी ठेवावी लागते.कॅम्पस प्लेसमेंटमधून मास रिक्रूटमेंट करणाऱ्या प्रसिद्ध कंपन्या एकेका वर्षात १० हजार ते ३५ हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देतात.त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होते तर दुसरीकडे संबंधित कंपन्यांना चांगली गुणवान विद्यार्थी मिळवण्यात मदत होते.असेच सीएसआर पुरस्कृत ची सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग,फायनान्स अँड इन्शुरन्सचे उद्घाटन कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालय.

   सदर प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी असेंट फिनान्शिअल,नाशिकचे संचालक व प्रमुख प्रशिक्षक विकास करंजीकर,असेंट फिनान्शिअल,नाशिकचे संचालक व प्रमुख प्रशिक्षक अश्विन निगुडकर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.संतोष पगारे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र जाधव  आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

   सदर प्रसंगी प्रमुख प्रशिक्षक विकास करंजीकर म्हणाले की,’बजाज फिन्सर्वच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी अंतर्गत विविध महाविद्यालयातील युवा पिढीला शिक्षणासोबतच बँकिंग,फायनान्स व इन्शुरन्स क्षेत्रातील ज्ञान कौशल्य व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचे कामही दिले जाते.याविषयीचे स्पष्टीकरण केले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्याचे हे सलग तिसरे वर्ष असून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात यावर प्रकाशझोत त्यांनी टाकला आहे.
 

    दरम्यान यावेळी असेंट फिनान्शिअल,नाशिकचे संचालक व प्रमुख प्रशिक्षक अश्विन निगुडकर यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाची भूमिका व विद्यार्थ्यांना दिलेली जाणारे प्रशिक्षण याविषयीचे सविस्तर माहिती दिली आहे.तसेच प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासंदर्भात मोलाचे योगदान दिले.याप्रसंगी प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये गुणात्मक बदल कशाप्रकारे घडून येतात याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना लाभार्थी विद्यार्थ्यांचे अनुभव चलचित्रणाच्या माध्यमातून दाखविले आहे.

  सदर प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.संतोष पगारे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी कसे लाभदायक आहे याविषयी मार्गदर्शन केले आहे.

    सदर प्रसंगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मान्यवरांचे स्वागत केले तर डॉ.संजय अरगडे यांनी उपस्थित मान्यवर व प्रशिक्षकांचा परिचय करून दिला.प्रा विजय सोमासे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close