जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

समताला अडचणीत आणण्याचा डाव उधळला-माहिती 

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगावसह राज्यात अग्रगण्य असलेल्या समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने काही विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे.संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर सहकार मंत्रालयाकडून ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने समता पतसंस्थेला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे ओमप्रकाश कोयटे.

दरम्यान समता सहकारी पतसंस्थेच्या वतीने १० डिसेंबर २०२५ रोजी थकबाकीदारांच्या विरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली.प्रसंगी ज्यांनी सहकार मंत्रालयाकडे चौकशीची याचिका दाखल केली होती ते थकबाकीदार संजय चंद्रकांत मोरे,वसंत मधुकर घोडके,ओमप्रकाश बाबूआप्पा खके सुनावणी दरम्यान सहकार मंत्रालयात उपस्थित होते.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समक्ष सहकार मंत्रालयात झालेल्या सुनावणीत समता पतसंस्थेची चौकशी थांबविली आहे.

   कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मोठ्या उत्साहात आगामी २० डिसेंबर रोजी संपन्न होत असून त्यासाठी राष्ट्रवादीने मागील सन-२०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी जय्यद तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार नाही अशी स्थिती दिसून येत आहे.पहिल्या प्रचार टप्प्यात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले होते.त्यासभेला त्यांनी मोठी गर्दी जमवली होती.त्यानंतर मात्र दि.२९ नोव्हेंबर रोजी न्यायिक कारणाने निवडणूक पुढे ढकलली होती.त्यानंतर सर्वच पक्ष थोडे ढिल्या अंगाने निवडणूक घेतील असे वाटत असताना अपक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा मरगळ झटकून मुसंडी मारून कामाला गती दिली असल्याचे दिसून आले आहे.मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.
तथापि राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेला वसुलीबाबत दुखावलेल्या  कर्जदारांना हाताशी धरून अडचणीत आणण्याची विरोधकांनी खेळी केली होती.त्यामुळे ठेवीदारांत अस्वस्थता निर्माण झाली होती.परिणामी त्याचा फटका बनण्यास सुरुवात झाली होती अशी नागरिकांत चर्चा सुरू झाली होती.त्यावर आज राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे.

समता सहकारी पतसंस्था कोपरगाव.

  

दरम्यान समता नागरी सहकारी संस्थेने या बदनामीबाबत संबंधित कर्जदाराविरुद्ध बदनामी केल्या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल करणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक सचिन भट्टड यांनी शेवटी दिली आहे.

    त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”विरोधकांच्या पाठबळावर थकबाकीदारांनी संस्थेविरोधात चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्या होत्या.या अगोदर देखील याच थकबाकीदारांनी संस्थेविरोधात सहकार खात्याकडे अर्ज दाखल करून ही संस्थेला अडचणीत आणण्याचे काम केले होते मात्र त्याची चौकशी होऊन सहकार विभागाने पतसंस्थेला क्लीन चीट दिली आहे.त्या चौकशीत संस्थेविरोधात काहीही निष्पन्न झालेले नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.दरम्यान याच थकबाकीदारांनी उच्च न्यायालय,जिल्हा जिल्हा न्यायालयात देखील संस्थेविरोधात याचिका दाखल केल्या होत्या.परंतु चुकीच्या याचिका दाखल केल्या असता उच्च न्यायालयानेच त्यांना फटकारून त्या याचिका फेटाळून त्या थकबाकीदारांना ५० हजारापर्यंत दंड ठोठावलेला होता.

   समता पतसंस्थेच्या वतीने ॲड.विजय गवांदे यांनी बाजू मांडली त्यावेळी ते म्हणाले की,”समता पतसंस्थेची वसुली कठोर व कायदेशीर करण्यात येत असते.सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांची वसुली देखील कायदेशीर करण्यात आली आहे.सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची किंमत ठरवून त्यांच्या समक्ष विक्री करण्यात आली होती.ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीने त्यांच्या जप्त केलेली मालमत्ता विकण्यात आली नसून थकबाकीदारांची कोणतीही फसवणूक झाली नाही.

   याउलट संस्थेचे अध्यक्ष कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांची बदनामी विरोधकांनी त्या थकबाकीदारांना एकत्र आणून चालू केली होती.विरोधकांकडून सहकार आयुक्त कार्यालयावर दबाव आणून ही चौकशी लावण्यात आली आणि संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते.परंतु विरोधकांनी काका कोयटे यांना विरोध करण्यासाठी थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेची चौकशी लावली असून त्या थकबाकीदारांची देखील चौकशी करण्यात यावी अशी  मागणी कोयटे यांनी शेवटी केली आहे.

   दरम्यान समता पतसंस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सहकार खात्याने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे सभासद व ग्राहकांच्या विश्वासावर पारदर्शक,शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने कार्यरत असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता नसल्याचे यापूर्वीही प्रत्येक वर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये अ दर्जा मिळून स्पष्ट झाले आहे.मात्र, कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये संस्थेचे अध्यक्ष कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असल्यामुळे विरोधकांचा थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेचा अपप्रचार व अफवा,सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव चालु असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद पटेल यांनी दिली आहे.

   दरम्यान समता सहकारी पतसंस्थेच्या वतीने १० डिसेंबर २०२५ रोजी थकबाकीदारांच्या विरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली.प्रसंगी ज्यांनी सहकार मंत्रालयाकडे चौकशीची याचिका दाखल केली होती ते थकबाकीदार संजय चंद्रकांत मोरे,वसंत मधुकर घोडके,ओमप्रकाश बाबूआप्पा खके सुनावणी दरम्यान सहकार मंत्रालयात उपस्थित होते.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समक्ष सहकार मंत्रालयात झालेल्या सुनावणीत समता पतसंस्थेची चौकशी थांबविली आहे.दरम्यान संस्थेने याबाबत संबंधित कर्जदाराविरुद्ध बदनामी केल्या प्रकरणी दावा दाखल करणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक सचिन भट्टड यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close