जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

हॉलीबॉल स्पर्धेत… या संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  अहील्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच अहिल्यानगर येथे पार पडली असून गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ वर्षाखालील संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखून हि स्पर्धा जिंकली आहे.स्पर्धेत खेळतांना गौतमच्या मुलींनी उपांत्यपूर्व सामन्यात कर्जत संघाचा सरळ सेटमध्ये २५-१३ असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात नेवासा तालुका संघाचा सरळ सेटमध्ये २५-१२, २५-१६ असा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला  असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  

   स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राहाता संघाचा  सरळ सेट मध्ये २५-१८, २५-११ सामना जिंकून स्पर्धा ही जिंकली आहे.१५ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा विजेता संघ अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.गौतम पब्लिक स्कूल च्या मुलींच्या विजेत्या हॉलीबॉल संघाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सर्व संस्था सदस्य,संस्था निरीक्षक नारायण बारे आदींनी अभिनंदन केले आहे.
 
  गौतम पब्लिक स्कूलच्या विजेत्या हॉलीबॉल संघास प्राचार्य नूर शेख यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक,पर्यवेक्षिका ज्योती शेलार,हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे व क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले होते.             

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close