जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन

न्युजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील कृष्ण भक्ताचे श्रद्धास्थान असलेले संवत्सर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिराचा ३५ वा वर्धापन चैत्र शुद्ध द्वितीया सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी सायंकाळी संपन्न होत असून या यात्रा महोत्सवाचा संवत्सर आणि तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चक्रधर स्वामी मंदिरांच्या वतीने विश्वस्त यांनी केले आहे.

   

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदाकाठी पदस्पर्श झाला असल्याचे मानले जाते.त्या ठिकाणी आज मोठा आश्रम असून मोठे मंदिर उभारले आहे.त्याचा ३५ वा वर्धापन दिनी सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी संपन्न होत आहे.

  जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले,तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार मानले जातात.ते महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत.महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जातात.’लीळाचरित्र’ या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी च आहेत.इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.त्यांचा कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदाकाठी पदस्पर्श झाला असल्याचे मानले जाते.त्या ठिकाणी आज मोठा आश्रम असून मोठे मंदिर उभारले आहे.त्याचा ३५ वा वर्धापन दिनी सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी संपन्न होत आहे.त्या निमित्त ‘वार्षिक यात्रा महोत्सव’ संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या संवत्सर येथील आश्रमाच्या वतीने देण्यात आली आहे.

  त्या निमित्ताने सायंकाळी ०५ वाजता पूजा अर्चना संपन्न होणार आहे.तर सायंकाळी ०६ वाजता पालखी सोहळा संपन्न होणार आहे तर रात्री ०८ वाजता फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.

  या कार्यक्रमाचा संवत्सर,कोकमठाण,कोपरगाव,धोत्रे,भोजडे,वारी,कान्हेगाव आदी परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close