पर्यटन व तीर्थक्षेत्र
माजी केंद्रिय कृषीमंत्री यांचे साई दर्शन संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारताचे माजी केंद्रिय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली आहे.दरम्यान त्यांनी आरतीनंतर समाधीचे दर्शन घेतले आहे.

सदर प्रसंगी शिर्डी मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.साईबाबा दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सत्कार केला आहे.साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.