जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

निवडणूक मानधनास अक्षम्य विलंब,कर्मचारी नाराज !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


लोकसभा निवडणूक संपन्न होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपन्न झालेला असताना अद्यापही कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कर्मचाऱ्याचे मानधन दिलेले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सदर मानधन तात्काळ द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

  

  दरम्यान या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो स्थापित होऊ शकला नाही त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांचा अभिप्राय समजू शकला नाही.

राज्य निवडणूक आयोग आपल्या विविध निवडणुकीच्या कामात युद्ध पातळीवर निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करून निविध निवडणुका लढवत असतो.त्यासाठी वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करून ही निवडणूक संपन्न होत असते.त्यात केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी,केंद्रस्तरीय अधिकारी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यांना दिल्या जातात.त्या कामासाठीचे वेगवेगळे प्रशिक्षणही दिले जाते.तसेच काम केल्यानंतर त्यासाठी स्वतंत्रपणे मानधनही दिले जाते.मात्र सहा महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या शिक्षकांसह विविध कर्मचारी आणि अधिकारी आदींना मानधन दिलेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाकडे आपली तक्रार दाखल केली आहे.त्यात त्यांनी म्हंटले आहे की,”आम्ही कोपरगाव विधानसभा निवडणुकीत नुकतेच बिनचूक काम केले आहे.त्या मानधनाचे विहित नमुन्यात प्रपत्र भरून दिले असून निवडणूक शाखेस दाखल केलेले आहे.तर या पूर्वी सहा महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत काम केल्याने त्याचे मानधन आले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातील अकरा विधानसभा मतदार संघात हे मानधन हे मूळ वेतनाप्रमाने दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.मात्र कोपरगाव विधानसभा मात्र अपवाद केला आहे.कोपरगाव येथील कार्यालयात चौकशी केली असता सदर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची आरोप त्यांनी केला आहे.

   सदर निवेदनावर एस.डी,सुपेकर,डोंगरे आर.जे.,श्रीमती कचवे डी.सी.,संगीता चव्हाण,आशिष बाळू,ऋग्वेद झावरे,सोनवणे सी.एस.,संतोष नलगे,अभिषेक वाघमारे,राजू त्रिभुवन,उर्मिला धुमाळ,ए.एस.लावरे,अस्वले संतोष,हनुमान गवळी,बी.सी.वाघमोडे,आदीसह ३८ कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close