जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घरासमोर कचरा टाकल्याने दोघांना मारहाण,दोघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  आमच्या घरासमोर कचरा का टाकला याचा जाब विचारल्याचा राग येऊन आरोपी लक्ष्मण सुरेश बनकर व संगीत लक्ष्मण बनकर आदींनी आपल्याला व आपल्या पत्नीस लोखंडी पाईपणे मारहाण केल्या प्रकरणी फिर्यादी रावसाहेब वाल्मिक बनकर (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे ब्राम्हणगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

फिर्यादी रावसाहेब बनकर व त्यांची पत्नी योगिता बनकर हे आपल्या घरी राहत असताना त्यांच्या घरासमोर शेजारी असलेले आरोपी संगीता लक्ष्मण बनकर हिने रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कचरा आणून टाकला ? त्याचा फिर्यादीचे पत्नीने सवाल विचारला असता त्यावरून ही हाणामारी झाली आहे.दोन जण जखमी झाले आहे.

   अलीकडील काळात माणसांची सहनशीलता शिल्लक राहिली की नाही असा प्रश्न तयार व्हावा अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे संस्काराची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीत रविवार दि.१६ जून रोजी घडली आहे.यातील फिर्यादी रावसाहेब बनकर व त्यांची पत्नी योगिता बनकर हे आपल्या घरी राहत असताना त्यांच्या घरासमोर शेजारी असलेले आरोपी संगीता लक्ष्मण बनकर हिने रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कचरा आणून टाकला ? त्याचा फिर्यादीचे पत्नीने सवाल विचारला व फिर्यादी आरोपी लक्ष्मण बनकर यास म्हणाला की,”तुझ्या सामायिक बांधावरील तुझी मोठी झाडे साळून घे” असे म्हणाला असता त्याचा राग येऊन आरोपी लक्ष्मण बनकर याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपणे फिर्यादिस व त्यांच्या भाऊ काकासाहेब वाल्मिक बनकर यास व फिर्यादीचे पत्नीस शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे.या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटना स्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.वांढेकर व सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत.

    दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२३०/२०२४ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close