निधन वार्ता
प्रकाश कांगणे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील साईतृप्ती रेस्टोरंट चे संचालक व निवारा हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी प्रकाश पुंजाजी कांगणे (वय-६८) आज दुपारी ०४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्यावर आज रात्री ०८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,०२ मुले,०२ मुली असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगरसेवक जनार्दन कदम,राष्ट्रवादीचे उपशहराध्यक्ष डॉ.अनिरुद्ध काळे आदिनी दुःख व्यक्त केले आहे.