जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

थकीत कर्ज वसुलीसाठी कायदा गतिमान करणार-सहकार आयुक्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये राज्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार पतसंस्थांच्या थकीत कर्ज वसुली साठीचा कायदा अधिक प्रभावशाली व गतिमान होण्यासाठी योग्य ते बदल करणार असल्याची ग्वाही शिर्डी येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे.

“देशातील १७ ते २० टक्के नासाडी माल साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे होत असते. भारतात उत्पादित होणाऱ्या भाजीपाला,फळांची कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसल्याने नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.ही नासाडी रोखण्यासाठी सहकार खात्याने वेअर हाऊस व स्टोरेज बांधण्यासाठी परवानगी द्यावी”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य पतसंस्था फेडरेशन.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित शिर्डी येथील प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.

सदर प्रसंगी राज्य फेडरेशनचे संचालक ॲड.अंजली पाटील,भास्कर बांगर वासुदेव काळे आदींसह नंदुरबार जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.कांतीलाल ताटीया,जळगाव जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे,नागपूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे,भंडारा जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.सारवे,कोल्हापूर जिल्हा फेडरेशनच्या वतीने फेडरेशनचे सर व्यवस्थापक दिपक पाटील,सांगली जिल्हा फेडरेशनचे गडचे,सोलापूर जिल्हा फेडरेशनचे दिलीप पतंगे,पुणे जिल्हा फेडरेशनचे महादेव वाघ पालघर जिल्हा फेडरेशनचे शहराध्यक्ष जाधव,बीड जिल्हा फेडरेशनचे चंद्रकांत शेजुळ,ठाणे जिल्हा फेडरेशनचे सर्जेराव शिंदे,जालना जिल्हा फेडरेशनचे अभय कुलकर्णी,अ.नगर जिल्हा फेडरेशनचे सुरेश वाबळे,वसंत लोढा,नाशिक जिल्हा फेडरेशनचे नारायण वाजे,भास्कर बांगर आदिसंह पतसंस्थांचे प्रतिनिधी,पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

सदर प्रसंगी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित प्रतिनिधींसोबत प्रत्येक मागणी बाबत सविस्तर चर्चा केली.त्या नंतर सहकार आयुक्तांसमोर मागण्यांबाबतचा मसुदा चित्रफितीच्या माध्यमातून सादर केला.दरम्यान या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन असल्यामुळे युवा प्रतिनिधी समीर जैन यांच्या हस्ते अनिल कवडे यांचा सत्कार करण्यात आला.राज्य फेडरेशनच्यावतीने अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते पतसंस्थांच्या अडचणी,विविध प्रश्न,समस्या विषयीची माहिती पेन ड्राईव्हमध्ये साठवून तो पेन ड्राईव्ह निवेदन स्वरूपात सहकार आयुक्तांना देण्यात आला.

सदर प्रसंगी प्रास्तविक कोयटे यांनी केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की,”देशातील १७ ते २० टक्के नासाडी माल साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे होत असते. भारतात उत्पादित होणाऱ्या भाजीपाला,फळांची कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसल्याने नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.ही नासाडी रोखण्यासाठी सहकार खात्याने वेअर हाऊस व स्टोरेज बांधण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

सदर शिबिराचे सुत्रसंचालन राज्य फेडरेशनच्या सुरेखा लवांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुरेश वाबळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close