जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
साहित्य व संस्कृती

श्रोत्यांच्या प्रतिसादासह रंगली काव्य मैफल !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  भाषेचा प्रसार करणे,नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपली जावून नव्या पिढीमध्ये कवितेविषयी आवड निर्माण व्हावी या साठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मराठी महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीच्या वतीने शनिवार दि.०२ रोजी सायंकाळी ०६ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या वतीने बहारदार भव्य काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विविध कवींच्या कवितांनी काव्य मैफिल रंगली असल्याचे आणि कोरगावकरांना मोठी काव्य मेजवानी मिळाली असल्याचे दिसून आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या वतीने बहारदार भव्य काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी विविध कवींच्या कवितांनी काव्य मैफिल रंगली असताना सर्वच कवी,राजकीय नेते आणि आयोजकांनी या कार्यक्रमाला मोठी दाद दिली असल्याचे दिसून आले आहे.

  सदर प्रसंगी कोपरगावचे राजभाषा समितीचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,महाराष्ट्र राज्य राजभाषा समितीचे सदस्य आमदार संजय केणेकर,वैजापूरचे आ.रमेश बोरनारे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,या काव्य मैफिलीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आबा पाटील,नितीन चंदनशिवे,रमजान मुल्ला,महिला कवी गुंजन पाटील,लता ऐवळे,तालीफ सोलापुरी,आबेद शेख,शशिकांत शिंदे,शिवाजी बंडगर आणि संदीप काळे आदी कवीं उपस्थित होते.

  दरम्यान यावेळी आ.आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं असून त्यांनी,”आज उपस्थित असलेले आमचे कार्यकर्ते तमाशा,नाटक,सिनेमा पाहतात पण ते आजच्या कार्यक्रमाला ते आले म्हणजे आम्ही (आ.काळे) यांनी आयोजित केला म्हणून आले असल्याचे सांगताच उपस्थितांत हशा पिकला आहे.सुशांत घोडके यांनी याची कल्पना मांडली म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगून त्यांना श्रेय दिले आहे.त्यानिमित्ताने कोपरगाव तालुक्यातील साहित्यिकांचा सत्कार होईल अशी कल्पना मांडली आहे.आमच्या मेहुण्यांनी याबाबत पूर्वी अशा काव्य मैफलीबाबत कल्पना देऊन असा कार्यक्रम घेण्यास सुचवले होते.आपण ते दाजी असल्याने नाही म्हणू शकलो नाही पण आज तो कार्यक्रम होत आहेत पण ते आज आपल्यात नाही याची खंत व्यक्त केली आहे.

  यावेळी संजय काणेकर यांनी आ.काळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना मराठीची चांगली जाणीव असल्याचे सांगितले आहे.”गर्जा महाराष्ट्र माझा” हे काव्य मराठी माणसाला प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले आहे.त्यावेळी त्यांनी खान्देशातील मराठी कवयत्री बहिणाबाई चौधरी यांची “अरे, संसार संसार ‘ ही कविता ऐकवली व हे शिक्षणातून नव्हे तर मराठी भाषेमुळे प्रकटीकरण होत असल्याचा दावा केला आहे.

  यावेळी आ.रमेश बोरनारे म्हणाले की,”एरव्ही कवी किंवा साहित्य संमेलन म्हटले की केवळ दर्दी दिसतात पण येथे सर्व हौसे,नवशे,गवशे उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.आ.काळे आणि आपली विधानसभेत कारकिर्द एकाच वेळी सुरू झाली आहे.ही दुसरी टर्म आहे.मी बऱ्याच वेळा त्यांनी निधी कुठून आणला हे विचारतो.ते ती आनंदाने सांगतात.आम्ही एकमेकास विचारून मतदारसंघात विकासकामे करत असतो.माझे गुरु माजी आ.स्व.आर.एम.वाणी यांनी कायम साहित्यिकांना प्रोत्साहन दिले होते.आपण मतदार संघात पाच कोटींचे नाट्यगृह बनवले आहे.मी सर्व कवी आणि आपल्याला बोलवणार आहे.त्यानी त्यावेळी कवयित्री पाटील यांच्या कविता युट्यूबवर ऐकत असल्याचे सांगत त्यांना आपली ‘टमटम ‘ ही प्रेमाची कविता ऐकविण्याची विनंती केली असल्याचे दिसून आले आहे.

  यावेळी तालिब कोल्हापुरी यांनी मराठी आणि उर्दूचा वापर करून शब्दांचा फुलोरा फुलवला आहे त्यात,”मुस्कारते मेरी धडकन को इजहार दे,आदी कविता ऐकवून ते मोठी दाद मिळवून गेले आहे.

   यावेळी कोल्हार येथील शशिकांत शिंदे यांनी,गावपण हरवल्याने,कविता ऐकवली आहे.तर कवी संदीप काळे यांनी आपल्या कवितेत,” वेदना ज्याला परक्याची आपली वाटत जाते,टाका घालताना सई अशी करू नये घाई,टाका घालण्याच्या सुइला मानावे आपली बाई,आणि रिकामी असलेली बाई भरल्या घरात वावरते आदी कविता ऐकवल्या आहेत.

  यावेळी लता ऐवळे यांनी राज्यातील कीर्तनकार आणि प्रवचनकारापर्यंत पोहचलेली,”बाप ” ही कविता ऐकवली आहे.उरी हुंदका दाटतो या बापाची कथा सांगताना,अनेकांना गदगद झाल्याचे जाणवले आहे.

  यावेळी कवी रमजान मुल्ला यांनी आपल्या कविता ऐकवली आहे त्यात त्यांनी,”मुलगी म्हणजे आळवा वरचे पाणी,सांडून जाते ती एक दिवस ती उन्हाळ त्याचे जगणे रे” या कवितेने मुलींच्या जन्माचा जागर केला आहे.त्याला रसिकांनी चांगली दाद दिली आहे.

  यावेळी प्रारंभी आबेद शेख यांनी आपली गझल ऐकविण्यास सुरुवात केली आहे.यारहो क्षमा करत चला.हे वार खंजिराचे आदी  कविता ऐकवल्या असून टाळ्या मिळवल्या आहेत.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना,प्रश्न मिटणार नाही आत्महत्या करण्याने “मी पेरले पेरले दाणे चोचीत दाणे आदी कविता ऐकवल्या आहेत.

  यावेळी आबासाहेब पाटील यांनी मी कवी सारखा दिसत नाही अशी कोटी केली आहे.अक्षर लिहिता आले म्हणून तुम्ही सुसंकृत होत नाही.आणि बहिणाबाईंना निरक्षर आणि अडाणी म्हणणे बंद केले पाहिजे असे आवाहन केले आहे.माझ्या गुरुजींनी मला मोठे स्वप्न पाहायला शिकवले होते म्हणून मी पाचवीत असताना सातवीच्या मुलीस लाइन मारत होतो.(हशा),माझ्या भाकरीचा शोध संपत असे पर्यंत अशीच हसत रहा मोनालिसा ‘ हि टाळ्या घेणारी कविता ऐकवून ते श्रोत्यांची दाद मिळवून गेले आहे.

  सदर प्रसंगी कवयत्री गुंजन पाटील यांची,”आपली नॅनो पण कोणाला मर्सिडिज वाटत असते” कवितेने त्यांना दाद मिळवून दिली आहे.”हवाई जहाज सोडून टमटम कमावले”या कविताने मोठी दाद मिळवून श्रोते हसू आवरू शकले नाही.त्यांनी उपस्थितांच्या आपल्या कवितेने फिरक्या घेतल्या असून वर्तमानात तरुणाई कशी भरकटली याचे वास्तव हृदयस्पर्शी पद्धतीने मांडले आहे.

  यावेळी नितीन चंदनशिवे यांनी,”पाखरांच्या चोचीतला घास व्हावी कविता” ही कविता अंतकरणाला भावून गेली आहे.त्यांनी रायगडाच्या पायथ्यापासून सुरू केलेली कविता वंचित पर्यंत येऊन ठेपलेली कविता,”असेल तो इथेच कुठे,”ही कविता वर्तमान राजकीयस्थितीचे वास्तव दाखवून गेली आहे.ऐकून श्रोत्यांनी मोठा जल्लोष केला असल्याचे दिसून आले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगाव साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र कोयटे यांनी केले असून त्यांनी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील साहित्यिकांचे प्रश्न मांडले असून खुले नाट्यगृह तांत्रिक गोष्टी दूर झाल्यानंतर लवकरच होणार असल्याचे सांगून साहित्यिकांच्या समस्या मांडल्या आहे.तर स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन कवी इंद्रजीत घुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेंद्र जाधव यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close