सहकार
…या कारखान्याचा कर्मचारी बोनस जाहीर!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आपल्या कर्मचाऱ्यांना एकरक्कमी २० टक्के बोनस देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

दरम्यान त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार करण्यात आलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांच्या १० टक्के पगारवाढीच्या एकूण रक्कमेची अंमलबजावणी करतांना ५० टक्के फरकाची रक्कम ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांना कारखान्याकडून अदा करण्यात आली आहे.ज्याप्रमाणे २०२५-२६ च्या हंगामातील ऊसाला यापूर्वी पहिली उचल प्र.मे.टन रुपये ३ हजार दिल्यानंतर जून महिन्यात प्र.मे.टन रुपये १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत.
दिवाळी तोंडावर आली असताना विविध सहकारी संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक बोनस देत असून यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.त्यात त्यांनी आपल्या कामगारांना एकरक्कमी २० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसची जवळपास साडेपाच कोटी रुपये रक्कम बाजारात येणार असून त्याचा फायदा कोपरगावच्या बाजारपेठेसाठी होणार असल्याचे मानले जात आहे.त्याचे कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले आहे. दरम्यान त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार करण्यात आलेल्या कारखाना कर्मचाऱ्यांच्या १० टक्के पगारवाढीच्या एकूण रक्कमेची अंमलबजावणी करतांना ५० टक्के फरकाची रक्कम ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांना कारखान्याकडून अदा करण्यात आली आहे.ज्याप्रमाणे २०२५-२६ च्या हंगामातील ऊसाला यापूर्वी पहिली उचल प्र.मे.टन रुपये ३ हजार दिल्यानंतर जून महिन्यात प्र.मे.टन रुपये १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत.त्यामध्ये वाढ करून कार्यक्षेत्रातील ऊसाला रु.१५० व प्रोत्साहनपर अनुदान रु.५० असे एकुण २०० प्र.मे.टन तसेच कार्यक्षेत्राबाहेर रु.१५० प्रमाणे ऊस बिलाची रक्कम दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व ऊस उत्पादकांचे बँक खात्यात जमा केली आहे.

दरम्यान या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या वतीने युनियनचे महासचिव नितीन गुरसळ व सचिव प्रकाश आवारे आदींनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे महाव्यवस्थापक सुनिल कोल्हे,आसवनी प्रकल्पाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ,मुख्य लेखापाल वैभव काळे आदी होते.



