जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या संस्थेच्या सभासदांना मिळणार १५% लाभांश!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  गत आर्थिक वर्ष अखेर समता सहकारी संस्थेने गतवर्षी संपलेल्या वित्तीय वर्षात १ हजार कोटी रुपये ठेवीचा टप्पा ओलांडला होता.दि.३० मार्च २०२६ अखेर ११०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा ओलांडुन समताच्या एकुण ठेवी १ हजार १३० कोटी रुपयांपर्यंत गेल्या असल्याची माहिती देऊन संस्था आपल्या सभासदांना आगामी काळात 15 टक्के लाभांश देणार असल्याची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे.

“जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे समताचे सोने तारण कर्ज ६०० कोटीचे आहे.या कर्जामध्ये १००% वसुली झालेली असल्यामुळे सोने तारण कर्जाचे आधारे समता लिक्वीडीटी बेस प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४% ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांच्या ठेवी १००% सुरक्षित आहे”-अरविंद पटेल,उपाध्यक्ष,समता सहकारी पतसंस्था, कोपरगाव.

 

  त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की,”आर्थिक वर्ष अखेर समता पतसंस्थेची आर्थिक पत्रके ३१ मार्चला जाहीर करण्याची परंपरा गेल्या ४० वर्षापासुन कायम राखली असुन याही वर्षी ३१ मार्च २०२६ ला शासकीय सुटटी असल्याने दि.३० मार्चला आर्थिक पत्रके जाहीर करत असुन समताच्या लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४% ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित आहे.सहकार खात्याने घालुन दिलेल्या निकषांप्रमाणे वैज्ञानिक तरलता २५% राखणे आवश्यक असतं ती दि. ३० मार्च अखेर २७.५२% इतकी म्हणजे ३११ कोटी रुपये इतकी गुंतवणुक राखली आहे.या व्यतिरिक्त रोख  तरलता १ टक्का राखणे आवश्यक असते.ही ११ कोटी ७२ लाख राखली आहे समताचे एकूण कर्ज वाटप ८२५ कोटी रुपये आहे.तसेच समताचा संमिश्र व्यवसाय २ हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे.

समता पतसंस्थेची आर्थिक पत्रके ३१ मार्चला जाहीर करण्याची परंपरा गेल्या ४० वर्षापासुन कायम राखली असुन याही वर्षी ३१ मार्च २०२६ ला शासकीय सुटटी असल्याने दि.३० मार्चला आर्थिक पत्रके जाहीर करत असुन समताच्या लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४% ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांपर्यंत ठेवी सुरक्षित आहे.सहकार खात्याने घालुन दिलेल्या निकषांप्रमाणे वैज्ञानिक तरलता २५% राखणे आवश्यक असतं ती दि. ३० मार्च अखेर २७.५२% इतकी म्हणजे ३११ कोटी रुपये इतकी गुंतवणुक राखली आहे.

  गत आर्थिक वर्षात समताच्या नफ्यामध्ये वाढ झालेली असुन हा नफा ८ कोटी २५ लाख रुपयांच्या पुढे पोहचला आहे.दि.११ मे १९८६ रोजी स्थापन झालेल्या समता पतसंस्थेला यावर्षी ४० वर्ष पुर्ण होत आहे.गत ४० वर्षात कायम “अ” वर्ग प्राप्त झालेल्या समताच्या सभासदांना या वर्षी १५% लाभांश देण्याचा निर्णय वर्ष अखेर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.तसेच समता पतसंस्थेने वयाची चाळीशी ओलाडतांना गत ४० वर्ष सातत्याने सभासद असलेल्या सभासदांचा सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती दिली आहे.
   समताने थकबाकी वसुलीत देखील थकबाकीदारांची तक्रार न येता अत्यल्प थकबाकी ठेवण्यात समताला यश मिळाले आहे.संस्थेच्या कोपरगांव शाखेच्या ठेवी ४०० कोटी रुपयांच्या पुढे पोहचल्या असुन श्रीरामपुर शाखेच्या ११० कोटी रुपयांच्या पुढे तर राहाता शाखेच्या १२५ कोटी रुपयांच्या पुढे ठेवी पोहचलेल्या आहेत.येवला शाखेच्या ६० कोटी रुपयांच्या पुढे ठेवी असुन शिर्डी शाखेच्या ५५ कोटी रुपयांच्या पुढे ठेवी पोहचलेल्या आहेत.समताचा शाखा विस्तार २७ शाखांपर्यंत पोहचला असुन पुढील आर्थिक वर्षात ४० शाखांपर्यंत नेण्याचा संकल्प आहे.

 

समता सहकारी पतसंस्थेच्या कोपरगांव शाखेच्या ठेवी ४०० कोटी रुपयांच्या पुढे पोहचल्या असुन श्रीरामपुर शाखेच्या ११० कोटी रुपयांच्या पुढे तर राहाता शाखेच्या १२५ कोटी रुपयांच्या पुढे ठेवी पोहचलेल्या आहेत.येवला शाखेच्या ६० कोटी रुपयांच्या पुढे ठेवी असुन शिर्डी शाखेच्या ५५ कोटी रुपयांच्या पुढे ठेवी पोहचलेल्या आहेत.समताचा शाखा विस्तार २७ शाखांपर्यंत पोहचला आहे.

    नवीन राष्ट्रीय सहकार धोरणाप्रमाणे केंद्र व राज्य शासनाने सहकारा अंतर्गत सहकार या धोरणाला प्राधान्य दिलेले आहे.या धोरणा अंतर्गत देशातील विविध कार्यकारी सोसाट्यांना १५० प्रकारचे विविध व्यवसाय करण्याची परवानगी मिळालेली आहे.या अंतर्गत समता पतसंस्थेने कोपरगांव शहरातील नावाजलेली कोपरगांव तालुका प्रगत सहकारी सोसायटीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी समता पतसंस्थेने स्विकारलेली आहे.कोपरगांव तालुका प्रगत सहकारी सोसायटीचे अध्यक्ष वैभव सुर्यभान गिरमे,उपाध्यक्ष जयश्री अनिल बोरावके व संचालक मंडळाने यास सहमती दर्शविली आहे.त्यामुळे समताच्या ४० व्या वर्षात कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी अनेक व्यवसायिक व सामाजिक कामे करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.

   जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे समताचे सोने तारण कर्ज ६०० कोटीचे आहे.या कर्जामध्ये १००% वसुली झालेली असल्यामुळे सोने तारण कर्जाचे आधारे समता लिक्वीडीटी बेस प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.९४% ठेवीदारांच्या ६० लाख रुपयांच्या ठेवी १००% सुरक्षित आहे असल्याची माहिती आहे.तर ६०० कोटी रुपयांच्या सोने तारण कर्जापैकी ५० हजारांचे वर कर्जदारांना कर्ज वितरण केलेले आहे.सुधन गोल्ड लोन मुळे समताच्या अती सुरक्षित समजल्या जाणा-या सोने तारण कर्जात ०% एन.पी.ए.असून थकबाकी ०% राखण्यात यश मिळाले असल्यामुळे एकही कलम थकीत नाही.संस्थेच्या एकुण कर्ज वाटपापैकी ७३% सोने तारण कर्ज समताने वितरीत केले असल्याची माहिती संदीप कोयटे यांनी शेवटी दिली आहे.

  सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,उपाध्यक्ष उपाध्यक्ष अरविंद पटेल व संचालक जितुभाई शहा,महिला संचालिका श्वेता अजमेरा व अक्षरा पटेल,निरव रावलिया, दिपक अग्रवाल व गिरीष सोनेकर,संचालक कचरू मोकळ,सर व्यवस्थापक सचिन भट्टड,वसुली अधिकारी जनार्दन कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close