जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सोमैय्या महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन समारंभ होणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.संजीव कुलकर्णी लिखित ‘द अर्थ; बिगिनींग ऑफ द अर्थ’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.सयाजी कोऱ्हाळे व न्या.भुजंग पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप रोहमारे यांनी दिली आहे.

सदर कार्यक्रम के.जे.सोमैय्या महाविद्यालयातील ‘साकरबेन सोमैय्या’ सभागृहात संपन्न होणार आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे राहणार आहे.

सदर प्रसंगी माजी लेफ्टनंट कर्नल नरेन दास,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पर्यावरण विभागाचे अवकाश प्राप्त प्रा.डॉ.प्रवीण सप्तर्षी,महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close