कोपरगाव तालुका
कोपरगावात ऑनलाइन स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“मराठी पंधरवड्या निमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘नवा कृषी कायदा’, ‘कोरोना’, ‘लॉक डाऊन’, ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ इत्यादी विषयांवर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी यादरम्यान करण्यात आले होते.त्यामध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषा गौरव दिनी कवी संतोष तांदळे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती के.जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव व मराठी विभाग प्रमुख डॉ.गणेश देशमुख यांनी येथे दिली आहे.
प्राचार्य डॉ. यादव पुढे म्हणाले की, “या निमित्ताने सर्व सेवकांच्या मराठी स्वाक्षरी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामध्ये अनुक्रमे प्रा.डॉ.संजय अरगडे (वाणिज्य),जेजुरकर गणेश (कनिष्ठ महाविद्यालय),डॉ.बी. बी.भोसले (भौतिकशास्त्र विभाग), संजय पाचोरे (प्रयोगशाळा सहाय्यक) यांच्या स्वाक्षऱ्या सर्वोत्तम ठरल्या तर पुढील विद्यार्थी विभिन्न स्पर्धांमध्ये यशस्वी झाले.
ते पुढील प्रमाणे:-
काव्यलेखन स्पर्धा:- प्रथम क्रमांक- कुमारी वैष्णवी संजय देशमुख, द्वितीय क्रमांक- ऋषिकेश संजय टुपके, तृतीय क्रमांक- साजिद लियाकत शेख, उत्तेजनार्थ- कु. जान्हवी दिलीप निकम व वैष्णवी लालजी होन.
प्रश्नमंजुषा स्पर्धा:- प्रथम क्रमांक- कु. भक्ती भारत नेहरे, द्वितीय क्रमांक- कुमुदिनी जितेंद्र निकम, तृतीय क्रमांक- निलेश अरुण तिरमके, उत्तेजनार्थ- आकाश सुनील साळवे व कु. माया चांगदेव पवार.
घोषवाक्य स्पर्धा:- प्रथम क्रमांक- कु. दीक्षा रामदास वाघ, द्वितीय क्रमांक- कु. सय्यद आलिया इजाज, तृतीय क्रमांक- कु. स्वप्नाली काकासाहेब पवार, उत्तेजनार्थ- शिवम राजेश चवाळे व कु. लीना किशोर इनामके.
या सर्व स्पर्धकांना मराठी भाषा गौरव दिनी कवी संतोष तांदळे यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थित ग्रंथ भेट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. एस.बी.दवंगे तर आभार प्रदर्शन डॉ.जे.एस.मोरे यांनी केले. सर्व कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागातील प्रा.डॉ. विठ्ठल लंगोटे यांनी केले होते.या स्पर्धेत एकूण २२६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सहभाग नोंदविला अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली आहे.