धार्मिक
कोपरगावातून साई संस्थानच्या विश्वस्तपदासाठी एकाची लॉटरी,तर दोघांना नारळ,निष्ठावान शिवसैनिक नाराज!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या साई संस्थानच्या विश्वस्त निवडीला मुहूर्त लागण्याची काही चिन्हे अद्याप मिळतं नसून नुकत्याच संपन्न झालेल्या जनहित याचिकेत साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणूक करणाऱ्या नियमावलीला आव्हान देणारी याचिका मंजूर झाली असताना काही राजकीय पक्षांनी हा मामला उच्च न्यायालयात असल्याचे भानावर येत आपले विश्वस्त बदलण्याचा निर्णय घेतला असून त्यात सत्ताधारी पक्षाचे दोन विश्वस्त मुख्यमंत्र्यांनी बाद ठरवले असून त्यात सेनेच्या दोघांचा तर काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या भाच्याला समावेश असल्याची विश्वसनीय मात्र धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यात राहुरी व मुंबईस्थित माजी विश्वस्तांचा समावेश असून त्या जागेवर मूळ पाथर्डीतील मात्र वर्तमानात कोपरगाव निवासी असलेल्या एका वैद्यकीय क्षेत्रातील माजी विश्वस्तांची लॉटरी लागली असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे यांचेशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी,”कोपरगाव तालुक्यातून आणखी एखादा विश्वस्त वाढला असेल व पक्षाने तसा निर्णय घेतला असेल तर ‘ती’ तालुक्यांसाठी आनंदाची बाब आहे.त्यामुळे साईभक्त व नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील”तथापि निष्ठावान शिवसैनिकाला ते पद मिळाले तर आनंद आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी जर त्या बाबत काही निर्णय घेतला असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू”असे म्हटले आहे.
दरम्यान उत्तर नगर जिल्ह्यातील काँग्रेस मधील मंत्री असलेल्या एका बड्या नेत्याच्या कोपरगाव शहरातील आपल्या भाच्यालाही आपल्या विश्वस्त पदाला मुकावे लागल्याचे वृत्त आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ऍड.सतीश तळेकर यांच्या मार्फत दाखल केलेल्या जनहित यांचेमध्ये उच्च न्यायालयाने तदर्थ समिती स्थापन केली होती.साईबाबा संस्थान ट्रस्टचे आज रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त विभागीय आयुक्त,नासिक व सह धर्मादाय आयुक्त,अहमदनगर यांची तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे.सदर समिती ऑक्टोबर २०१९ पासून साईबाबा संस्थान चा कारभार सांभाळत आहे.सरकारने गत महिन्यात दि.२० जून रोजी साईबाबा संस्थानच्या १६ विश्वस्ताची नावे जाहीर केली होती.त्यातील काही व्यक्तीचा सत्कार करणारे फलक देखील लावण्यात आल्याच्या बातम्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या होत्या.सदर संभाव्य विश्वस्त मंडळा मधील व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी,अपात्र ठरलेले,शासनाला फसवलेले,अवैध धंदे करणाऱ्यांची धक्कादायक नावे आली होती.त्यामुळे काही नागरिकांनी सदर नावाला उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे नसल्याचा आक्षेप नोंदवला आहे.संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकी संदर्भात गैरकारभार होऊ नये म्हणून राज्य शासनाने नियमावली तयार केली पण त्याचे पालन शासन स्वतः करत नसल्याची धक्कादायक बाब या निमित्ताने याचिकाकर्त्यांनी उघड केली होती.त्यामुळे या बेकायदेशीर विश्वस्त मंडळ नेमणुकीला याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.त्या निमित्ताने शासनाने १६ विश्वस्तांचे राजकीय वाटप तीन पक्षामध्ये करून घेतले असल्याचेही उघड आले होते.या घटना लक्षात येताच शासने उच्च न्यायालयात मुदतवाढ घेऊन अपात्र,अनुभव नसलेले व सामाजिक माध्यमात चर्चेत आलेले व्यक्तींना विश्वस्त नेमण्यासाठी विश्वस्त नेमणूक नियम,२०१३ मधील पात्रता व अनुभवाचे निकष शिथिल करण्याचा घाट घालत नेमणूक नियमात नुकतीच दि. ०५ जुलै रोजी दुरुस्ती केली केली होती वास्तविक हि या जनहित याचिकेनुसार सरकारची न्यायालयापुढे नाचक्कीच झाली होती.आता हि सुनावणी दोन आठवड्यांनी होत असताना हि धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान या दोन विश्वस्तांची नेमणूक करताना शिर्डी अथवा स्थानिक शिवसैनिकांना विचारात न घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून आम्हाला पक्षाने आयुष्यभर केवळ जोडे उचलण्यासाठी ठेवले आहे का ? असा तिखट सवाल विचारला आहे.शिवाय कोपरगावातून नेमलेले विश्वस्त हे शिवसेनेत आहे की राष्ट्रवादीत ? हा हि सवाल उपस्थित केला आहे.कारण या विश्वस्तांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.त्यामुळे या निवडीवर जिल्ह्यातील शिवसेनेत गदारोळ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.दरम्यान हे माजी कोपरगाव शहरातील माजी विश्वस्त हे,” वैयक्तिक पातळीवर प्रामाणिक असून त्यांचे यापूर्वीचे काम लक्षवेधी होते हे विसरता येत नसल्याच्या” प्रतिक्रिया दुर्लक्षून चालणार नाही असेही एकाने बोलून दाखवले आहे.
दरम्यान दुसरे विश्वस्त हे मुंबईतील असून त्यांची गतवेळी साई संस्थानवर निवड झाली खरी पण अध्यक्षपदावरून त्या वेळी भाजप व शिवसेनेत वाद निर्माण झाला होता.त्यातून पक्षपमुख यांनी त्यांच्या विश्वस्तांना पद ग्रहण करू न देता चारही वर्ष अनुपस्थित ठेवले होते.परिणाम स्वरूप आता तीन सभांना अनुपस्थित राहणाऱ्या विश्वस्तांना आता अपात्र ठरवले जाणार हे उघड आहे.’ती’ मेख ओळखून पक्षनेत्यांनी त्यांना थेट,”तुम्ही तीन बैठकांना अनुपस्थित राहिल्याने तुम्हाला विश्वस्त म्हणून राहाता येणार नसल्याचे” सांगितल्याने या महाशयांना आपलेच तोंड बडवायची वेळ आली आहे.त्यावेळी पक्ष आदेश पाळण्याचा निर्णय घेतल्याने,”हेच फळ का मम तपाला ? म्हणण्याची नामुष्की ओढवली आहे आता बोला!तर काँग्रेसमधील उत्तर नगर जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या कोपरगाव शहरातील एका भाच्याला हि आपले पद गमवावे लागले असल्याची बातमी उशिराने हाती आली आहे.त्यामुळे पक्षातील निष्ठावानांना डावलून आपल्या सोयरेशाहीचे घोडे दामटणाऱ्या राजकीय नेत्यांना या घटनेने चांगलीच चपराक बसली आहे.दरम्यान हि जनहित याचिका आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल निर्माण झाला आहे.