जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगावातील…या विद्यालयात वाचन-प्रेरणा दिन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांत १५आॕक्टोंबर माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती हा वाचन-प्रेरणा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे.त्यानिमित्ताने विशेष लेख.दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे त्यातून कोपरगावातील श्रीमान गोकुलचंद विद्यालयात हा दिन उत्साहात संपन्न झाला आहे.

श्री.गो.विदयालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे सचिव दीलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

सदर प्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल तोच शिकेल असे स्पष्ट केले.व हात धुवा दिना निमित्तानं वारंवार हात धुण्याचे महत्त्व समजावुन सांगितले.विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांच्या विविध घटनांचा संदर्भ देत त्यांच्या अग्निपंख ह्या पुस्तकाचा अभ्यास करा असे सांगितले.ग्रंथपाल आव्हाड ए.एल यांनी विदयार्थींना विविध पुस्तकांच्या पी.डी.एफ.फाईल स्वरुपात वाचनासाठी उपलब्ध करुन दिल्या.विदयालयांचे पर्यवेक्षक यु.एस.रायते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन ए.के.काले यांनी तर आभार जेष्ठ क्रीडा शिक्षक एन.के.बडजाते यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close