जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

नाशिक-पुणे रेल्वे मार्गास शिर्डीस जोडण्यासाठी प्रयत्नशील-..या नेत्याचे आश्वासन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  उत्तर नगर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी महत्वाचा असणारा झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्यासाठी आपण पहिल्या लोकसभा अधिवेशनात रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचेकडे आवाज उठवला आहे.शिर्डी विमानतळ ते ओझर विमानतळ यातही २०१६ साली १० कोटी रुपयांचा निधी देऊन हा रस्ता दुहेरी केला आहे.नाशिक पुणे रेल्वे मार्गास जवळके,बहादरपूर मार्गे,आपण शिर्डीस जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.नुकत्याच पुणे येथील विभागीय बैठकीत तो प्रश्न आपण उपस्थित केला असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

यावेळी शिवसेनेचे पश्चिम तालुका प्रमुख गंगाधर रहाणे यांनी नाशिक ते पुणे रेल्वे मार्गास जवळके बहादरपूर मार्गे शिर्डी लोहमार्ग जोडावा,झगडे फाटा ते वडगाव पान हा मार्गे राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करा आदी मागण्या केल्या आहेत.


  कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील स्व.दशरथ रहाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेनेचे शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव रहाणे हे होते.

 

  सदर प्रसंगी उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुंबई येथील मलबार हिल समन्वय प्रमुख शिवाजी रहाणे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे,शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष मुकुंद सिनगर,महेंद्र सोनवणे,शिवसेनेचे जिल्हा समन्वयक कलविंदर दडियाल,विधानसभा अध्यक्ष किरण खर्डे,पश्चिम कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख गंगाधर रहाणे,पूर्व तालुक्याचे तालुकाप्रमुख संजय दंडवते,धर्माजी जावळे,मनोज कपोते,वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफानभाई,जयंतराव गडाख,श्री शर्मा,सेनेचे उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे,ह.भ.प.भास्कर महाराज गव्हाणे,सुभाष रहाणे,रमेश टिटवा,बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे,उपसरपंच रामनाथ पाडेकर,माजी सरपंच कैलास रहाणे,विजय रहाणे,रामनाथ रहाणे,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.

  

दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे आपल्या कार्यक्रमास उशिरा येण्याच्या सवयीबाबत त्यांनी  “मै देर करता नहीं;देर हो जाती है”सांगत शिर्डीत भेटणारे जास्त लोक असतात,बाहेरील प्रांतातील आमदार,खासदार आलेले असतात त्यामुळे उशीर होत उपस्थित मला माफ करतील अशी अपेक्षा केली मात्र हजारास महत्व द्यायचे की पाचास याचे उत्तर दिले नाही.

त्यावेळी पुढे बोलताना खा.वाकचौरे म्हणाले की,”माणसे मोठी होतात पण गावाला ते विसरत नाही त्याचे उदाहरण मुंबईतील शिवसेनेचे समन्वयक शिवाजी रहाणे हे असून त्यांनी गेली ३५ वर्षे हा स्तुत्य उपक्रम सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांनी कौतुक केले आहे.त्यावेळी त्यानी “मै देर करता नहीं हो जाता है”सांगत शिर्डीत भेटणारे जास्त लोक असतात,बाहेरील प्रांतातील आमदार,खासदार आलेले असतात त्यामुळे उशीर होत उपस्थित मला माफ करतील अशी अपेक्षा करून त्यांनी रस्त्याच्या प्रश्नाला हात घातला आहे.त्यावेळी जिल्हा नियोजन समितीतून बहादरपूर – पाथरे रस्त्याला १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.त्याचे ग्रामस्थानी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.आपण जिल्हा परिषदेत अधिकारी असताना शनी शिंगणापूर साठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली आहे.

 

   सदर प्रसंगी शालांत आणि उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव उपस्थित मान्य अर्ंच सत्कार करण्यात आला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा धर्माचा असून अकोले पासून नेवासा पर्यंत अनेक तीर्थक्षेत्र आहेत.झगडे फाटा ते वडगाव पान त्यासाठी आपण पहिल्या लोकसभा अधिवेशनात रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचेकडे आवाज उठवला आहे.शिर्डी विमानतळ ते ओझर विमानतळ यातही २०१६ साली १० कोटी रुपयांचा निधी देऊन हा रस्ता दुहेरी केला आहे.नाशिक पुणे रेल्वे मार्गास जवळके,बहादरपूर मार्गे,आपण शिर्डीस जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.नुकत्याच पुणे येथील विभागीय बैठकीत तो प्रश्न आपण उपस्थित केला असल्याची त्यांनी शेवटी आठवण करून दिली असून गावांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्या असे आवाहन केले आहे.

  यावेळी शिवाजी रहाणे यांनी बहादरपूर ते पाथरे रस्त्याचे काम मार्गी लावण्याची विनंती खा.वाकचौरे यांचेकडे केली आहे.यावेळी त्यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे हे कार्यक्रमास उशीर करत आल्याबाबत खेद व्यक्त केला आहे.यावेळी सेनेचे जिल्हा समन्वयक कलविंदर दडियाल,तालुका प्रमुख गंगाधर रहाणे, आदींनी उपस्थिताना मार्गदर्शन केले आहे.

  सदर प्रसंगी प्रास्ताविक वामन रहाणे यांनी केले तर सूत्रसंचालन साईनाथ रहाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब ची.रहाणे यांनी मानले आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close