जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महावितरण विभाग

पोल पडून साडे चार महिने उलटले,पिके जळून खाक,शेतकरी हैराण !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील मात्र येवला तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या नाटेगाव हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतात महावितरण कंपनीचे पोल पावसाने पडूनही साडेचार महिने उलटूनही याकडे महावितरण अधिकाऱ्यांना पाहायला वेळ असल्याचे दिसत नाही.परिणामी शेतकऱ्यांना वीज तर मिळत नाहीतच पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे महावितरण कंपनीच्या कोपरगाव येथील अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी येथील शेतकरी जनार्दन शिवाजी लोंखडे व रघुनाथ मोरे यांनी केली आहे.

महावितरण कंपनीचे वादळामुळे नाटेगाव येथील शिवारातील पोल पडून नवे पोल उभे केले आहेत.मात्र त्यावर तारा ओढल्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

कोपरगाव येथील ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता,वीज वितरण कार्यालय कोपरगाव यांना लेखी पत्र दिनांक 09 सप्टेंबर रोजी दिले आहे.त्याबाबत वारंवार फोटो पाठवले,निवेदन दिले आहे.मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.दूरध्वनी केला तर त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना शेतकऱ्यांनी केली आहे.त्यामुळे खरीप पिके जळून गेली आहे.याशिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत आहे.या परिसरात बिबट्या आढळून येत असून शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

     महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.विजेचे पोल कोसळून जवळपास चार महिले उलटून गेले आहे.मात्र ही कंपनीकडून कोणतीही दुरुस्ती किंवा मेंटेनन्स केला जात नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.याबाबत येथील शेतकरी जनार्दन शिवाजी लोंखडे व रघुनाथ मोरे यांनी त्यांचे क्षेत्र गट क्र.-११४ व गट क्र.-११५ मध्ये पावसाळी वादळामुळे जून महिन्यात पोल पडले आहे.त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याचे उघड झाले आहे.

  याबाबत कोपरगाव येथील ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता,वीज वितरण कार्यालय कोपरगाव यांना लेखी पत्र दिनांक 09 सप्टेंबर रोजी दिले आहे.त्याबाबत वारंवार फोटो पाठवले,निवेदन दिले आहे.मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.दूरध्वनी केला तर त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना शेतकऱ्यांनी केली आहे.त्यामुळे खरीप पिके जळून गेली आहे.याशिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत आहे.या परिसरात बिबट्या आढळून येत असून शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.त्यामुळे कोपरगाव ग्रामीणच्या महावितरण अधिकाऱ्यांनी तातडीने दाखल घेऊन हे पोल पूर्ववत करून द्यावे अशी मागणी जनार्दन शिवाजी लोंखडे व रघुनाथ मोरे या शेतकऱ्यांनी केली आहे.आता महावितरण कंपनीचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close