महसूल विभाग
हजार कोटींच्या वतनाच्या जमिनीसाठी आक्रोश मोर्चा,सभागृह दणाणले ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महार वतनाची ५०.३३ एकर जमीन परस्पर वाटून घेणाऱ्या आणि ०१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून त्या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांच्या विरुद्ध अत्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी आज महाराजस्व अभियानात आज बहुंसंख्य दलीत शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन करून सत्ताधारी आणि महसूल विभागाला कात्रीत पकडले असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान वर्तमान सर्व्हे क्रमांक १९५३ मधील जमिनी महार वतनाच्या असल्याचे उघड झाल्याने ज्यानी त्या अवैधरितीने आपल्या ताब्यात घेतल्या आहे व अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायदा,१९८९ (एट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी बाबासाहेब (राजू) कोपरे व प्रकाश दुशिंग यांनी केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे महसूल विभाग आता काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे व विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव महसूल विभागाने आज महाराजस्व अभियान आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळी ही घटना उघडकिस आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

“नगर जिल्हाधिकारी यांनी दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी चौकशीचे आदेश दिले होते त्यात कोपरगाव मंडलाधिकारी यांनी दिनाक १७ ऑक्टोबर २०२४ च्या केलेल्या चौकशीत सदर बाब अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या संदर्भान्वये साबित झाला असल्याचा दावा केला आहे.पूर्वी १४ ऑक्टोबर २०१३ जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत ही बाब सिद्ध झाला असल्याचा दावा केला आहे.भूमी अभिलेख यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली असल्याने आता ज्यांच्या ताब्यात ही जमीन आहे त्यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे उघड झाले आहे”त्यामुळे आगामी काळ कोपरगाव तालुक्यातील नेत्यांना साडेसातीचा जाणार असल्याचे दिसू लागले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,दिलीपराव बोरनारे, श्रावण आसने, शंकरराव चव्हाण, विष्णू शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,शैलेश साबळे,विजय त्रिभुवन, वाल्मिक लहिरे,सोमनाथ आढाव,बाळासाहेब रुईकर,माजी नगरसेवक विरेन बोरावके, फकीर कुरेशी,अजीज शेख,सचिन गवारे, सुनिल फंड,गणेश बोरुडे,चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे,संतोष शेलार,मुकुंद भूतडा, नितीन बोरुडे,आकाश डागा,नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते,भूमी अभिलेख अधीक्षक रवींद्र खरोटे,निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम,शेतकरी तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी,कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक,नगरसेविका, कर्मचारी,माजी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

” कोपरगाव ग्रामीण हद्दीत गट क्रमांक अनुक्रमे ५,६,७,८,९ हे पूर्वीचे ०५ गट क्रमांक आमच्या महार वतनाच्या जमिनी आहेत.त्याच पुढे सिटी सर्व्हे होऊन त्याचा क्रमांक हा १९३५ झाला आहे.या ५०.३३ एकर क्षेत्राची आजची किंमत जवळपास ०१ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.हे आमचे वडिलोपार्जित महार वतनाचे क्षेत्र आहे हे तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्ध झाले आहेच पण सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेत हे सिद्ध झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची अवैध नोंद हटवली आहे”-बाबासाहेब (राजू) कोपरे,लाभार्थी शेतकरी,महार वतन,कोपरगाव.
त्यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे दलीत कार्यकर्ते प्रकाश दुशिंग,बाळासाहेब कोपरे,संतोष कोपरे,किशोर दुशिंग,आनंद कोपरे,लक्ष्मण कोपरे,माया कोपरे,प्रदीप कोपरे,भाऊसाहेब दुशिंग,राहुल दुशिंग,शाम कोपरे,संजय कोपरे,शशिकांत कोपरे,संदीप दुशिंग, दिपक कोपरे,सागर कोपरे,आकाश दुशिंग आदीसह बहुसंख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

त्यांनी दुपारी १२ वाजता कलश मंगल कार्यालय येथे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन प्रवेश केला व त्यांच्या घोषणेसह त्यांनी,”जमीन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची” ,आमची जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.त्यावेळी त्यांनी आ.आशुतोष काळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून तहसीलदार महेश सावंत यांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आंदोलनकर्ते प्रकाश दुशिंग व बाबासाहेब(राजू) कोपरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,” कोपरगाव ग्रामीण हद्दीत गट क्रमांक अनुक्रमे ५,६,७,८,९ हे पूर्वीचे ०५ गट क्रमांक आमच्या महार वतनाच्या जमिनी आहेत.त्याच पुढे सिटी सर्व्हे होऊन त्याचा क्रमांक हा १९३५ झाला आहे.या ५०.३३ एकर क्षेत्राची आजची किंमत जवळपास ०१ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.हे आमचे वडिलोपार्जित महार वतनाचे क्षेत्र आहे हे तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्ध झाले आहेच पण सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेत हे सिद्ध झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची अवैध नोंद हटवली आहे.वर्तमानात केलेल्या तक्रारीत आम्ही केलेल्या पुराव्यात मंडलाधिकारी यांनीही ही जमीन महार वतनाची म्हणजेच आमच्या वाली वारसांची असल्याचा अहवाल दिला आहे. दुशिंग व कोपरे हे त्याचे कायदेशीर वारस आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.मात्र १९२० ते १९३० च्या दरम्यान हे सर्व गट क्रमांक एकत्र करून त्याला सिटी सर्व्हे क्रमांक १९३५ हा दिला असून आमचा कायदेशीर हक्क डावलला गेला असल्याचा आरोप केला आहे.या जमिनीचे ०१ ते १७ प्लॉट पाडून ते खिरापती सारखे इतर असंबंध नागरिकांना वाटून दिले आहेत.यातील काही जमीन जिल्हाधिकारी यांनी १६ जुलै १९५१ रोजी १००/१०० मीटर ही जागा महार बोर्डिंग साठी आरक्षित केली असल्याचे (आज त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय आहे)त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.ती तत्कालीन मंत्र्यांना हाताशी धरून बळकावली आहे.तर १९७१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी अवैध आदेश देऊन ती जागा सि.टी.एस.क्रमांक २११३ देऊन हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे.याबाबत आम्ही मागणी केल्यावर अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी दिनाक ०६ सप्टेंबर २०२४ रोजी चौकशीचे आदेश दिले आहे.

कोपरगाव मंडलाधिकारी यांनी दिनाक १७ ऑक्टोबर २०२४ च्या केलेल्या चौकशीत सदर बाब अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या संदर्भान्वये साबित झाला असल्याचा दावा केला आहे.पूर्वी १४ ऑक्टोबर २०१३ जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीत ही बाब सिद्ध झाला असल्याचा दावा केला आहे.भूमी अभिलेख यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली असल्याने आता ज्यांच्या ताब्यात ही जमीन आहे त्यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे उघड झाले आहे.त्याजागी आता वर्तमानात गांधी प्रदर्शन सभामंडप,कार्यालय,पुतळे,शाळा,व्यापारी संकुले असा बराच मोठा लवाजमा असल्याने यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांची मोठी पंचाईत होणार असल्याचे नागरिकांत बोलले जाऊ लागले आहे.त्यातच आज ज्यांची ही महार वतनाची जमीन आहे.ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन संघटित झाल्याने हा लढा आगामी काळात आणखी कठीण होऊन सत्ताधारी वर्गाला पिछाडीवर घेऊन जाऊ शकतो असे बोलले जाऊ लागले आहे.त्यामुळे आज उपस्थित असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या भाळी काय लिहून ठेवले आहे ते लवकरच कळणार आहे.



