महसूल विभाग
…या दिवशी जप्त वाहनांचे लिलाव होणार!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणाऱ्या जप्त वाहनांचे जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी आगामी २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खननं करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश यापूर्वी दिलेले आहे.पंरतु सदर वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेले नसल्यामुळे अशा प्रकारचे वाहने लिलावाद्वारे विक्री करुन सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे”-महेश सावंत,तहसीलदार,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिज वाहतुक करणाऱ्या अनेक वाहने महसूल विभागाने वेळोवेळी जप्त केलेले आहे.या वाहनांचे जाहीर लिलावाद्वारे विक्री करणेबाबत निर्णय झालेला आहे.दरम्यान कोपरगाव तालुक्यात वाळु चोरी विरोधी पथकांनी गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खननं करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश यापूर्वी दिलेले आहे.पंरतु सदर वाहनाचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेले नसल्यामुळे अशा प्रकारचे वाहने लिलावाद्वारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दि.२३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वा तहसिल कार्यालय कोपरगाव येथे जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या लिलावात कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी,संस्थांनी लिलावात भाग घ्यावा.लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेले वाहने,लिलावात हातची किंमत,इ.बाबत कार्यालयीन वेळेत गौण खनिज शाखा तहसित कार्यालय कोपरगाव यांचेशी संपर्क साधावा.याबाबत माहिती तहसिल कार्यालय,कोपरगाव येथील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणेत आलेली असल्याची माहिती नायब तहसिलदार चंद्रशेखर कुलथे यांनी शेवटी दिली आहे.



