जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पोस्कोतील परप्रांतीय आरोपी निर्दोष मुक्त!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातील उत्तर प्रदेशातील उसका बाजार जिल्हा सिद्धार्थनगर येथील रहिवासी आशुतोषकुमार राजबल्ली प्रसाद यांला कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांनी निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड.अनुप ठोळे यांनी  दिली आहे.

  

उत्तर प्रदेशातील आरोपी आशुतोषकुमार राजबल्ली प्रसाद यांचे विरुद्ध ‘पोस्को’चा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.त्याची मोठी किंमत चुकवावी लागली असल्याचे दिसून आले आहे.त्याचे त्याच्या पेक्षा कमी वयाच्या मुलीशी प्रेमसंबध होते.त्यातून त्या संबंधातून एक मुलगा जन्मास आला होता.मात्र त्यानंतर मुलीच्या घरच्या लोकांनी आणि तिनेही नंतर अर्थ लोभापायी कातडीबचाव भूमिका घेऊन आरोपीस अडचणीत आणले असल्याची चर्चा आहे.त्यातून त्याला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

    पॉक्सो गुन्ह्यांचा आणि कायद्याचा होणारा दुरुपयोग सध्या एक अत्यंत गंभीर कायदेशीर व सामाजिक चिंतेचा विषय बनला आहे.सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी देखील यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.कायद्याचा मूळ उद्देश बालकांचे लैंगिक शोषणापासून रक्षण करणे आहे,मात्र वैयक्तिक वैमनस्यातून याचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.वैवाहिक वाद आणि सूडबुद्धी,घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये किंवा कौटुंबिक वादात,अनेकदा पत्नी पतीला किंवा त्याच्या कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी किंवा दबाव आणण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून पतीवर खोट्या पॉक्सो तक्रारी दाखल करतात.संमतीचे किशोरवयीन संबंधअसताना १८ वर्षांखालील मुलांमधील संमतीने झालेले प्रेमसंबंध किंवा शारीरिक जवळीक या कायद्याच्या कक्षेत गुन्हेगारी ठरतात.याचा फटका अनेकदा तरुण मुलांना बसतो.अशी उदाहरणे वारंवार समोर येत आहे.त्यामुळे अनेकाना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत असतो.काही प्रकरणात शिक्षाही होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.अशीच घटना सन-2024 साली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत घडली होती.

कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय.

   यातील आरोपी आणि कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी यांचे संमतीचे प्रेमसंबध असताना त्याला वेगळा रंग दिला गेला होता.त्यामुळे या गुन्ह्यातील उत्तर प्रदेशातील उसका बाजार जिल्हा सिद्धार्थनगर येथील रहिवासी आरोपी आशुतोषकुमार राजबल्ली प्रसाद यांस मोठी किंमत चुकवावी लागली असल्याचे दिसून आले आहे.त्याचे त्याच्या पेक्षा कमी वयाच्या मुलीशी प्रेमसंबध होते.त्यातून त्या संबंधातून एक मुलगा जन्मास आला होता.मात्र त्यानंतर मुलीच्या घरच्या लोकांनी आणि तिनेही नंतर अर्थ लोभापायी कातडीबचाव भूमिका घेऊन आरोपीस अडचणीत आणले असल्याची चर्चा होती.परिणामी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक २६८/२०२३  हा दाखल होऊन विशेष केस क्र.१/२०२४ दाखल झाली होती.या गुन्ह्यातील आरोपी आशुतोषकुमार राजबल्ली प्रसाद याचा खटला हा कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले यांच्यासमोर चालला होता.त्यात न्यायालयाचे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी आशुतोष प्रसाद याला भा.द.वि.कलम ३६३,३७६ व पोस्को कलम ४,८,१२ अन्वये पूर्ण निर्दोष मुक्त केले आहे.

   सदर प्रकरणात आरोपी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्याच्याकडे कोणतेही आर्थिक साधन नव्हते.त्यामुळे त्याला कायदेशीर मोफत विधी सहाय्य करण्यात आले होते.त्याचा खटला युवा विधीज्ञ अ‍ॅड.अनुप ठोळे यांनी चालवला होता.त्यासाठी विविध निवाडे आणि साक्षी,पुरावे त्यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले होते.फिर्यादी आणि साक्षीदार आदींच्या जबानीतील विसंगती न्यायालयाचे निदर्शनास आणून दिली होती.सरकारी पक्षाने ११ साक्षीदारांच्या साक्षीवर केलेल्या तपासानंतरही,पुरावे,साक्षीदारांच्या उलटतपास आणि प्रभावी युक्तिवादाच्या जोरावर आरोपीची निर्दोष मुक्तता सिद्ध केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close