जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

माजी मंत्री कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   माजी मंत्री कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन
सहकार क्षेत्रातील जाणकार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथे भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी
सहकारात विविध उपपदार्थ निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर दिशादर्शक ठरले होते.त्यांचे प्रयोग पाण्यासाठी स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तरुणपणात हजेरी लावली होती.त्यानंतरही त्यांचे पश्चात या कारखान्याचे प्रयोग अद्याप थांबलेले नाही हे विशेष !त्यांचा वारसा आता पुढील पिढ्या चालवत आहेत.स्व. कोल्हे यांच्या राजकीय कर्तृत्वाने तीन मुख्यमंत्र्यांना नारळ दिला होता.

   सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात सहकार,शिक्षण आणि कृषी क्षेत्राचा पाया रचला.सन-१९६० मध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा वसा घेतला.त्यांनी सहकारी चळवळीला शिस्तबद्ध नेतृत्वाच्या जोडीलाच शिक्षणसंस्था व तांत्रिक विकासाची जोड देऊन ग्रामीण अर्थकारणाला बळकटी दिली.सहकारात विविध उपपदार्थ निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर दिशादर्शक ठरले होते.त्यांचे प्रयोग पाण्यासाठी स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तरुणपणात हजेरी लावली होती.त्यानंतरही त्यांचे पश्चात या कारखान्याचे प्रयोग अद्याप थांबलेले नाही हे विशेष !त्यांचा वारसा आता पुढील पिढ्या चालवत आहेत.स्व. कोल्हे यांच्या राजकीय कर्तृत्वाने तीन मुख्यमंत्र्यांना नारळ दिला होता.

  दरम्यान स्व.शंकरराव कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ मंचर,पुणे एथिल ह.भ.प.शंकरजी महाराज शेवाळे यांच्या प्रबोधनात्मक वाणीतून कीर्तन सेवा होणार आहे.स्व.शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा व विचारांचा स्मरण करून समाजाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.समाजकारण,सहकार आणि लोकसेवा या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट,कोपरगाव यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.स्व.कोल्हे साहेब यांच्या सहवासात काम केलेले समस्त सहकारी, संजीवनी कारखाना परिसरातील मान्यवर,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच कोपरगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी या भक्तीमय कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व.शंकरराव कोल्हे यांनी सहकार चळवळ,शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी केलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित हा कीर्तन सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close